‘अजित पवारांना घेरण्याची गरज नाही’, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp chandrashekhar bawankule reaction on ajit pawar
bjp chandrashekhar bawankule reaction on ajit pawar
social share
google news

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार 30 ते 40 आमदारांसह भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.या चर्चेवर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुर्णविराम दिला आहे. या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटानंतर लगचेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या भाजपमधील सामील होण्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. (there is a no need to surround ajit pawar bjp chandrashekhar bawankule reaction on ajit pawar)

ADVERTISEMENT

अजित पवार यांची जी काही सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल, किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला मी डॅमेज कराव आज असा विषय नाही. त्यामुळे चर्चाच का होतेय मला कळत नाही,असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यात भाजपकडे विषय नाही, अजित दादांकडे विषय नाही. मग चर्चा का होतायत? चर्चा माध्यमाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा : Ajit Pawar: ‘जीवात जीव असेपर्यंत मी..’ अजित पवारांकडून एक घाव दोन तुकडे!

मी प्रदेशाध्यक्ष म्हणून, आज तुम्हाला जबाबदारीने सांगतोय,आजपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव किंचितभरही आमच्या समोर आला नाही, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता अजित पवारांच्या भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चाना आता दोन्ही बाजूने पुर्णविराम मिळालाय. तसेच जर तशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा कोणी पक्षात येईत तो तेव्हाचा तेव्हा विषय आहे,असेही ते म्हणाले.

हे वाचलं का?

सत्तेची चावी जनतेने आमच्या हातात दिली आणि आमच्याशी विश्वासघात झाला. आमच्याकडे जर बहूमत नसते आले, तरक हा प्रयत्न देवेंद्र यांनी कधीच केला नसता,असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच जनतेच्या मनात काय होते ते मतदानातून बाहेर आले होते. मात्र नंतर जी बेईमानी झाली त्या आधारवर तो व्यक्ती सरकार बसवण्याचे प्रयत्न करणार च ना. त्यामुळे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची काही चुक नाही आहे. तो त्या काळातला अपरिहार्य निर्णय होता, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

हे ही वाचा : अजित पवार राष्ट्रवादी सोडणार? गुलाबराव पाटलाचं मोठं विधान, म्हणाले, ‘हे’ अटळ’

दरम्यान त्या शपथविधीचा आधार घेऊन अजित दादांना वारंवार घेरण्याची गरज नाही. अजित पवारांच्य़ा विश्वासाहर्तवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे देखील योग्य नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी शेवटी अजित पवार (Ajit Pawar) यांची पाठराखण देखील केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT