काँग्रेस-भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ट्विटरवर भिडले! आशिष शेलार-वर्षा गायकवाडांमध्ये काय झालं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

varsha gaikwad and ashish shelar twitter war maharashtra politics
varsha gaikwad and ashish shelar twitter war maharashtra politics
social share
google news

मनसेने नुकतीच एक सही संतापाची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish shelar) यांनी ‘एक सही भविष्यासाठी’ अशी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत शेलारांनी ”पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा,” अशी टीका ठाकरेंवर करत तरूणांना मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले होते. मात्र या मोहिमेवर कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी शेलारांच्याच शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. नेमका आता शेलार-वर्षा गायकवाडांमध्ये काय आरोप-प्रत्यारोप रंगलाय? हे जाणून घेऊयात. (varsha gaikwad and ashish shelar twitter war maharashtra politics)

ADVERTISEMENT

आशिष शेलारांनी ट्विट करत एक सही भविष्यासाठीच्या मोहिमेची माहिती दिली. ही माहिती देताना शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली. मुंबईला मिळालेले गिफ्ट सिटीचे गिफ्ट ‘त्यांनी’ घालवले, भाजपाने ते परत मिळवले.बुलेट ट्रेनला ‘त्यांनी’ विरोध केला, पण भाजपाने संकल्प कायम ठेवला. मुंबई -दिल्ली कॉरिडॉरला ‘त्यांनी’ विरोध केला, पण भाजपाने मात्र विकासाचा मार्ग नाही सोडला. भाजपाने ‘त्यांच्या’ विरोधाला न जुमानता कोस्टल रोडचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही “त्यांचा” विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला “आयआयएम” दिली, प्रत्येक वेळी विरोध करणारे “ते” कपाळ करंटे त्यातही शिंकतील!, अशी टीका आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर केली होती.

हे वाचलं का?

तसेच मुंबईकरांनो ठाकरेंचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा, असे आशिष शेलार यांनी म्हणत, मुंबईला भरभरून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विकासाची एक वाट चालू या, तरुण मित्रांनो एका तुमच्या सहीत तुमचे भविष्य रेखाटू या!, आम्ही फक्त तुमच्याकडे…एक सही भविष्यासाठी मागतोय, अशी साद त्यांनी तरूणांना घातली.

वर्षा गायकवाड यांचे प्रत्युत्तर

वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलारांच्या ट्विट करण्याच्या स्टाईलच्या शैलीतच त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईचे ‘आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र’ पळवले, गुजरातला ‘गिफ्ट’ दिले, ‘सागरी पोलीस अकादमी’ पळवली, वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एयरबस प्रोजेक्ट, बल्क ड्रग्स पार्क, मेडिकल डिवाइस पार्क घालवले, बुलेट ट्रेन गुजरातला आणि खर्च महाराष्ट्राला, एकीकडे महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण तर, दुसरीकडे गुजरातचे औद्योगिकीकरण, असा पलटवार वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्यावर केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तसेच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच इथले प्रकल्प बाहेर नेले. राजकारण गढूळ केले, पक्ष फोडण्याचे पाप केले. या ट्रबल इंजिन सरकारच्या उदासीन कारभारामुळे विकासाला ब्रेक लागला आहे.फक्त बेरोजगारी आणि महागाईचा वेग वाढला आहे, अशी टीका देखील वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्यावर केली. म्हणूनच, स्वार्थी राजकारणापोटी आणि सत्ताकरणापोटी यांनी मुंबईला उध्दवस्त करणारी टाकलेली पावले तुम्ही वेळीच ओळखा.आणि सारे मिळून या अहंकारी आणि मुंबई द्वेषी सत्ताग्रहींना बाजूला सारून मुंबईच्या सर्वांगीण विकाससाठी एकत्र काम करूया, अशी साद त्यांनी तरूण मतदारांना घातली.याचसोबत मुंबईकरांची सही असो किंवा मत.. फक्त जनहितासाठी, प्रगतीसाठी, लोकशाहीसाठी, काँग्रेससाठी असेल असा विश्वास देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT