मणिशंकरांच्या पुतळ्याला जोडे अन् बाळासाहेब… CM शिंदेंनी दिली आठवण

मुंबई तक

ADVERTISEMENT

when balasaheb thackeray was beaten with shoes manishankars effigy on savarkar insult
when balasaheb thackeray was beaten with shoes manishankars effigy on savarkar insult
social share
google news

Balasaheb Thackeray Manishankar Aiyar Story: मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप (BJP) सातत्याने राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत आहे आणि शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही तिखट प्रश्न विचारत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 मार्च) पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारले आहेत. वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे एक जुने वाक्य शेअर करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (when manishankars effigy was beaten with shoes on savarkars insult cm shinde reminded uddhav of balasaheb thackeray story)

ADVERTISEMENT

2004 मध्ये बाळासाहेबांनी काय केलं होतं?

‘सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही’, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले की, ‘ते काय करतील हे मला जाणून घ्यायचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चपलांनी मारहाण केली, तसं ते राहुल गांधींच्या पुतळ्याला चपलेने मारहाण करतील का? असा सवाल शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.

अधिक वाचा- Savarkar: उद्धव ठाकरे खिंडीत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेरलं, केला सवाल

आता आपण जाणून घेऊया की, 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी नेमकं काय केलं होतं. 2004 साली तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यावर वीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी ‘चप्पल मारो’ आंदोलन सुरू केले होते. तेव्हा स्वत: बाळासाहेबांनी या आंदोलनात भाग घेतला होता. त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चप्पल मारत सावरकरांच्या अपमानाबाबत निषेध व्यक्त केला होता. आता त्याच गोष्टीचा उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या गोष्टीवरही जोर दिला की, ‘यावेळी हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांना राहुल गांधींच्या लाजिरवाण्या वक्तव्यावर एक शब्दही बोलता येत नाही. ते तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत, काळे कापड घालून सभागृहात येत आहे.’

ADVERTISEMENT

अधिक वाचा- भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?

आता याच मुद्द्यावरुन नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. या अपमानाच्या विरोधात आता भाजप आणि शिवसेना मिळून सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत. तसेच आजच्या पत्रकार परिषदेत शिंदे यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘विधानसभेत माझ्यासोबत चालत आल्याने उद्धव ठाकरे यांचे विचार बदलले असतील तर मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यासोबत विधानसभेच्या मुख् द्वारापासून चालण्यास तयार आहे. जेणेकरून ते सावरकरांसारख्या राष्ट्रीय नेत्यांचा आदर करायला शिकतील.’

अधिक वाचा- Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर.. : बावनकुळे

राहुल गांधींच्या कोणत्या विधानावरुन गोंधळ?

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द केल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने राहुल गांधींना प्रश्न विचारला होता की, जेव्हा हे लोक ‘माफी मागा’ म्हणतात तेव्हा राहुल गांधींना काय वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते, ‘मला वाटतं की, माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे’. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे यांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागली आहे. काल झालेल्या मालेगावमधील सभेतही उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT