रश्मी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याने शिलगला नवा वाद; ठाकरेंच्या सैनिकांचा शिंदेंवर गंभीर आरोप
Tembhi Naka Devi Shiv Sena: टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेत असताना त्या ठिकाणचे पंखे, साऊंड आणि कुलर हे मुद्दाम बंद करण्यात आले असा आरोप करत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
ADVERTISEMENT
Tembhi Naka Devi And Rashmi Thackeray: विक्रांत चौहान, ठाणे: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv sena UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी काल नवरात्रीनिमित्त ठाण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील (Thane) टेंभी नाक्यावरील (Tembhi Naka) देवीचे दर्शन घेतलं. पण याचवेळी एक नवा राजकीय वाद पाहायला मिळाला. रश्मी ठाकरे या जेव्हा टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आल्या तेव्हा मुद्दाम तेथील पंखे, कुलर आणि साऊंड बंद करण्यात आले असा आरोप ठाण्यातील ठाकरे गटाच्या नेते आणि शिवसैनिकांनी केला आहे. ज्यामुळे आता याच मुद्द्यावरून पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे गटामध्ये जुंपली आहे. (when rashmi thackeray came fans coolers deliberately switched off a new dispute in devi mandap over thane tembhi naka shiv sena thackeray group accuses shinde group)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड करून मूळ पक्षच ताब्यात घेतल्यापासून संपूर्ण शिवसेनेचं राजकारण हे बदललं गेलं आहे. अशावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब हे आता शिंदेंविरोधात मैदानात उतरलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदेवर थेट वार करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात जाऊन ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना वेगळ्या प्रकारे बळ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंकडून 6 निष्ठावंतांना ‘प्रमोशन’, मातोश्रीवरील बैठकीतील Inside Story
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सव हा स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केला होता. तेव्हापासून टेंभी नाक्यावरचा नवरात्रौत्सव हा शिवसेनेचा असंच समीकरण तयार झालं होतं. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा नवरात्रौत्सव नेमका कुणाचा यावरून बरीच चढाओढ पाहायला मिळत आहे. येथील देवी आगमन मिरवणुकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. तर काल (18 ऑक्टोबर) रश्मी ठाकरे यांनी देवीच्या मंडपात हजेरी लावून हा नवरात्रौत्सव आपलाच (शिवसेना UBT)असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.
हे वाचलं का?
दरम्यान, जेव्हा रश्मी ठाकरे या देवीच्या दर्शनासाठी मंडपात गेल्या तेव्हा तेथील पंखे आणि कूलर हे मुद्दाम बंद करण्यात आले असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी केला आहे. वाचा त्या नेमकं काय म्हणाल्या.
‘रश्मी ठाकरे येताच पंखे, कुलर बंद केले…’
‘टेंभी नाक्याची देवी ही दिघे साहेबांची देवी अशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज जवळजवळ 47 वर्ष अंबाबाईचा जागर होत आहे.अंबाबाईंचा जागर होत असताना बाळासाहेब, उद्धव साहेब, रश्मी वहिनी किंवा सगळं ठाकरे कुटुंबीय हे पहिल्यापासून टेंभी नाक्याला दर्शनासाठी येत असत. तसंच त्याप्रमाणे या वर्षी देखील रश्मी वहिनी दर्शनासाठी आल्या’
ADVERTISEMENT
‘पण रश्मी वहिनी देवीचे दर्शन घेत असतानाच त्या ठिकाणचे पंखे, साऊंड आणि कुलर बंद केले गेले. अरे देवाच्या दारात किती खोटेपणा करणार आहात, याला काही मर्यादा आहे की नाही? ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिकडचे कुलर बंद केले, पंखे बंद केले आणि साउंडही बंद केले..’
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Sanjay Raut: ‘हे समलिंगी सरकार, कारण…’, संजय राऊतांचा पुन्हा गेला तोल!
‘तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही. खोटेपणाने तुम्ही वागा देव बघतोय आणि देव यांची प्रचिती काय द्यायची ती देईल. त्यांना कदाचित यातून सुख मिळत असेल पण यांची लहान मनाची कृती कोत्या वृत्तीची आहे. ती आज सगळ्या जगाच्यासमोर त्यांनी दाखवली.’ अशा शब्दात रेखा खोपकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या सगळ्या आरोपांमुळे आता ठाण्यात पुन्हा एकदा नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT