IND vs SA : अर्शदीप सिंगने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज
पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.3 षटकांत अवघ्या 116 धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले फेहलुकवायोने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पाच आणि आवेश खानने चार विकेट घेतल्या होत्या.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना टीम इंडियाने आठ विकेट राखून जिंकला आहे. या विजयासह टीम इंडिया तीन वनडे सामन्याच्या मालिकेत 1-Oने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार अर्शदीप सिंह ठरला आहे. कारण अर्शदीप सिंगने या सामन्यात 5 विकेट घेतल्या आहे. या 5 विकेट घेऊन अर्शदीप सिंगने इतिहास रचला आहे. नेमका त्याने कोणता रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हे जाणून घेऊयात. (arshdeep singh record create history ind vs sa 1st odi team india vs south africa)
ADVERTISEMENT
पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.3 षटकांत अवघ्या 116 धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले फेहलुकवायोने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पाच आणि आवेश खानने चार विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर पाच बळी घेणारा अर्शदीप सिंग पहिला गोलंदाज ठरला आहे.
हे ही वाचा : ‘OBC विरोधात बोलणाऱ्यांचा…’, छगन भुजबळांचा थेट इशारा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेणारा अर्शदीप सिंग हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी भारताच्या तीन फिरकीपटूंनी प्रत्येकी 5 विकेट घेतल्या होत्या. सुनील जोशीने 1999 मध्ये 6 धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या. यानंतर युजवेंद्र चहलने 2018 मध्ये 22 धावांत पाच विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने 2023 मध्ये कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 33 धावांत 5 बळी घेतले होते.
हे वाचलं का?
तसेच एकदिवसीय डावात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. रविवारी (17 डिसेंबर) भारतीय वेगवान गोलंदाजांनी आफ्रिकेविरुद्ध एकूण 9 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने पाच आणि आवेश खानने 4 विकेट घेतल्या. यापूर्वी त्याने मोहाली (1993) आणि सेंच्युरियन (2013) येथे प्रत्येकी 8 बळी घेतले होते.
अर्शदीप सिंगने या सामन्यात रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, व्हॅन डर ड्युसेन, क्लासेन आणि फेहलुकवायो यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने 10 षटकात 37 धावा देत 5 बळी घेतले. आवेश खानने 8 षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : NCP : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, मराठा आरक्षणावरील आरोपांवर काय म्हणाल्या?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
5/6 – सुनील जोशी, नैरोबी, 1999
5/22 – युजवेंद्र चहल, सेंचुरियन, 2018
5/33 – रवींद्र जड़ेजा, कोलकाता, 2023
5/37 – अर्शदीप सिंह, वार्डरर स्टेडिअंम
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT