IPL 2021: आज खेळाडूंचा लिलाव, अर्जुन तेंडुलकरवर सर्वांच्या नजरा
मुंबई: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंचा लिलाव आज (18 फेब्रवारी) होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावासाठी 1097 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यापैकी 292 जणांना शॉर्टलिस्ट केलं आहे. पण या लिलावात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी कोणता संघ बोली लावणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून […]
ADVERTISEMENT
मुंबई: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंचा लिलाव आज (18 फेब्रवारी) होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावासाठी 1097 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यापैकी 292 जणांना शॉर्टलिस्ट केलं आहे. पण या लिलावात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी कोणता संघ बोली लावणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
आज होणाऱ्या या लिलावात आज अनेक खेळाडूंवर नजर असणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा डेव्हिड मलान, जेसन रॉय भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह, केदार जाधव याशिवाय अर्जुन तेंडुलकरवर फ्रेंचाइजी आणि क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
आज दुपारी ३ वाजता खेळाडूंना लिलावाचं थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तसेच या लिलावचे लाइव्ह अपडेट आपल्याला mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर देखील पाहता येणार आहे.
हे वाचलं का?
या लिलावासाठी 292 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. ज्यापैकी 169 खेळाडूंची बेस प्राइस ही 20 लाख रुपये आहे. तर 4 खेळाडूंची 30 लाख रुपये, 6 खेळाडूंची 40 लाख रुपये, 65 खेळाडूंची 50 लाख रुपये, 15 खेळाडूंची 75 लाख रुपये बेस प्राइस असणार आहे. याशिवाय 11 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राइस ही तब्बल 1 कोटी एवढी असेल. तर 12 खेळाडूंची 1.5 कोटी आणि 10 खेळाडूंची बेस प्राइस ही 2 कोटी एवढी आहे. या दहा खेळाडूंमध्ये २ भारतीय खेळाडू आहेत तर 8 परदेशी खेळाडू आहेत.
लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?
ADVERTISEMENT
-
मुंबई इंडियन्सकडे 15.35 कोटी रुपये शिल्लक आहेत. पण ते यावेळी अर्जुन तेंडुलकरला घेण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसू शकतात.
ADVERTISEMENT
सनरायझर्स हैदराबादकडे 10.75 कोटी रुपये आहेत. त्यामुळे ते अनकॅप्ड प्लेयर्सवर बोली लावू शकतात.
आरसीबीकडे 35.4 कोटी एवढी रक्कम आहे. त्यामुळे ते डेव्हिड मलान सारख्या खेळाडूंवर बोली लावू शकतात.
राजस्थान रॉयल्सकडे 37.85 कोटी एवढी रक्कम आहे. त्यामुळे मॅक्सवेल सारख्या हिटरला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करतील.
पंजाबकडे 53.20 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ते जेसन रॉयसारख्या खेळाडूवर अधिक बोली लावण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे आता फक्त 10.85 कोटी एवढीच रक्कम शिल्लक आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडे 13.40 कोटी रुपये आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सकडे सध्या 19.90 कोटी रुपये शिल्लक आहेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT