Video : गंभीर-श्रीसंत मैदानातच भिडले, सामना सुरू असताना काय घडलं?
श्रीसंतने गौतम गंभीरचा मिस्टर फायटर असा उल्लेख करत काय वाद झाला, याची माहिती दिली. ‘तो नेहमी त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो, तेही विनाकारण…’. ‘तो वीरू भाईसह त्याच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही’.
ADVERTISEMENT
Gautam Gambhir Fights With S Sreenath Legends League Cricket : भारतात सध्या टीम इंडियाच्या सिनीअर खेळाडूंची लिजेंड्स क्रिकेट लीग सूरू आहे. या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये माजी क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि माजी क्रिकेटर श्रीसंत (S Sreenath) भिडल्याची घटना घडली आहे. या दोघांमध्ये मैदानावर मोठा वाद झाल्याची माहिती आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. नेमका या दोन खेळाडूंमध्ये काय राडा झालेला? हे जाणून घेऊयात. (gautam gambhir s sreesanth fight video Gujrat giants vs india capitals eliminator legends league cricket)
ADVERTISEMENT
गौतम गंभीर (Gautam Gambhir) कर्णधार असलेल्या इंडिया कॅपिटल्स (india capitals) आणि पार्थिव पटेल (Parthiv Patel) कर्णधार असलेल्या गुजरात जाएंटस (Gujrat giants) या दोन संघात 6 डिसेंबरला सूरतमध्ये सामना रंगला होता. या सामन्यात गौतम गंभीर आणि गुजरात संघाकडून खेळणाऱ्या श्रीसंतमध्ये मैदानावर मोठा वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ आता श्रीसंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला श्रीसंत लिहतो की, गौतम गंभीरने असं काही बोलून गेला आहे,जे त्याने वरिष्ठ खेळाडू म्हणून बोलायला नको होते. या व्हिडिओमध्ये श्रीसंतने गौतमला ‘मिस्टर फायटर’ म्हटले आहे.
Emotions are always running high, when you were very passionate about your game.
Sreesanth and Gambhir in an animated chat during the @llct20 Eliminator!#LegendsLeagueCricket pic.twitter.com/Qjz8LqC41l
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 6, 2023
हे वाचलं का?
हे ही वाचा : Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
नेमका वाद काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, गुजरात जाएंट्सकडून गोलंदाजी करताना श्रीसंतला गौतम गंभीरने षटकार आणि चौकार लगावला होता. गंभीरने त्याची चांगलीच धुलाई केल्यानंतर श्रीसंत त्याला मैदानात घुरताना दिसला होता. या सामन्यात गंभीरने 30 बॉलमध्ये 51 धावा केल्या. अशाप्रकारे गंभीरच्या इंडिया कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 223 धावा ठोकल्या होत्या. तर श्रीसंतने या सामन्यात तीन ओव्हरमध्ये 35 धावा देऊन 1 विकेट घेतली. इंडिया कॅपिटल्सने दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरात संघाला 7 विकेट गमावून 211 ‘च धावा केल्या. त्यामुळे 12 धावांनी गुजरातचा पराभव झाला.
View this post on Instagram
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
सामन्यानंतर श्रीसंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्याने गंभीरवर टीका केली आहे. या व्हिडिओत श्रीसंतने गौतम गंभीरचा मिस्टर फायटर असा उल्लेख करत काय वाद झाला, याची माहिती दिली. ‘तो नेहमी त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो, तेही विनाकारण…’. ‘तो वीरू भाईसह त्याच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही’. आज नेमके तेच झाले. तो मला पुन्हा पुन्हा भडकवत होता, तो फक्त माझ्याशी अशाच गोष्टी सांगत होता ज्या अत्यंत अशोभनीय होत्या, ज्या गौतम गंभीरने बोलायला नको होत्या, असे श्रीसंतने सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Nalasopara Crime : ‘शेंबड्या’ म्हणत चिडवलं, 8 वर्षाच्या मुलीचा ‘त्याने’ जीवच घेतला
तसेच श्रीसंत सोबत झालेल्या वादाची लवकरच माहिती देणार आहे. यामध्ये माझी कोणतीही चूक नाही. मला संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करायची आहे, असे देखील श्रीसंतने सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT