World Cup 2023: भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न कसे भंगले? सेहवाग-गावस्करांनी सांगितली चूक
अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचे 241 धावांचे लक्ष्य अवघ्या 43 षटकांत पार केले.
ADVERTISEMENT
Ind vs Aus World Cup 2023 Final : टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांना ज्याची भीती होती अखेर तेच घडलं. विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला चांगलच पछाडलं. रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचे 241 धावांचे लक्ष्य अवघ्या 43 षटकांत पार केले. टीम इंडियाच्या हातून हा सामना कसा निसटला ते जाणून घेऊया. (How India’s dream of winning the World Cup 2023 was shattered What are mistakes said by Sehwag and sunil Gavaskar)
ADVERTISEMENT
मागील सर्व सामन्यांप्रमाणेच कर्णधार रोहित शर्माने फायनलमध्येही टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. रोहितने 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने झटपट 47 धावा केल्या. रोहितला साथ देत कोहलीनेही गीअर्स बदलले आणि मिचेल स्टार्कला एका षटकात सलग तीन चौकार ठोकले. पण रोहित शर्मा आऊट होताच टीम इंडियाच्या बॅटिंगला ग्रहण लागल्यासारखं वाटत होतं.
वाचा : Ind vs Aus Final : टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण
सामना कुठे आणि कसा निसटला?
रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये जाताच टीम इंडिया बाउंड्रीसाठी आस लावून बसलेली दिसली. 11 ते 40 षटकांमध्ये फलंदाजांनी केवळ दोन चौकार मारले. यामध्ये 27व्या षटकात केएल राहुलच्या बॅटने एक चौकार तर 39व्या षटकात सूर्यकुमारच्या बॅटने एक चौकार केला. या काळात टीम इंडियाचा रन रेट 5 पेक्षा कमी होता.
हे वाचलं का?
पार्ट टाइम गोलंदाजांना लक्ष्य करण्यात आले नाही
टीम इंडियाच्या या कामगिरीवर माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर नाराज दिसले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, ‘कोहली आणि केएल राहुल यांनी त्यांच्या पार्टरनरशिपवेळी पार्ट टाइम गोलंदाजांना लक्ष्य केले नाही.’ दोघांनी ब्राउंड्री केली नाही, पण कमीत कमी सिंगल घ्यायला पाहिजे होतं. असं त्यांचं मत आहे. तेव्हा भारताला 270 धावांचे लक्ष्य देता आले असते.
वाचा : Ind vs Aus World Cup Final LIVE : टीम इंडिया ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान
गावस्कर म्हणाले, ‘मिचेल मार्शने 2 षटकात केवळ 5 धावा दिल्या. ट्रॅव्हिस हेडने 2 षटकात केवळ 4 धावा दिल्या. माझ्या मते ही अशी षटके होती जिथे फलंदाज पार्ट टाइम गोलंदाजांना लक्ष्य करू शकत होते. कोणतीही जोखीम न घेता 20-30 धावा सहज करू शकलो असतो. अशा प्रकारे धावसंख्या 241 ऐवजी 265 किंवा 270 धावा होऊ शकली असती.
ADVERTISEMENT
कुठे चूक झाली ते सेहवागनेही सांगितले
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही पराभवानंतर वक्तव्य केलं आहे. सेहवाग म्हणाला, ‘250 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोहली आणि राहुल खूपच कम्फर्टेबल झाले होते. पण त्यांच्या पार्टनरशिपवेळी आणखी काही सिंगल घेऊन लक्ष्य वाढवता आले असते. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये फलंदाजांनी कोणतीही संधी घेतली नाही, ज्यामध्ये 5 फिल्डर वर्तुळात होते. इथे चौकार न मारताही 4-5 धावा सहज करता आल्या असत्या. तसंच, केएल राहुलने 66 धावा करण्यासाठी 107 चेंडू खर्च केले.’
ADVERTISEMENT
वाचा : भयंकर! महिला शिक्षिकेला बॅटने अर्धा तास मारहाण, लातुरात नेमकं काय घडलं?
फायनलमध्ये टीम इंडियाचा कसा पराभव झाला?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंचे वेगवान आक्रमण सुरुवातीपासूनच टीम इंडियावर वर्चस्व गाजवत होते. सर्वात आधी मिचेल स्टार्कने शुबमन गिलला 4 धावांवर क्रीझवरून बाहेर पाठवलं. त्यानंतर मॅक्सवेलने कर्णधार रोहितला ट्रॅव्हिस हेडच्या हातून कॅचआउट केलं. श्रेयस अय्यर 4 धावांवर पॅट कमिन्सचा बळी ठरला.
यानंतर कोहली आणि केएल राहुलने टीम इंडियाचा धडाकेबाज डाव पुढे नेला. दोघांमध्ये 109 चेंडूत 67 धावांची पार्टनरशिप झाली. पण त्यानंतर पॅट कमिन्सने 54 धावांवर कोहलीला बोल्ड केले. काही वेळाने स्टार्कनेही राहुलला 66 धावांवर क्रीझवरून हटवले. सूर्य कुमारने 18 धावा केल्या. शमी (6), बुमराह (1), कुलदीप (10) आणि सिराज 9 धावांवर नाबाद राहिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT