Ind vs Aus World Cup Final LIVE : टीम इंडिया ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान
भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सामन्याची संपूर्ण देशवासियांना उत्सुकला लागली आहे. हा सामना जिंकून भारत तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
ADVERTISEMENT
India vs Australia World Cup Final LIVE Update : ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान
वर्ल्ड कपच्या फानयल सामन्यात टीम इंडिया 240 धावावर ऑलआऊट झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान असणार आहे. आता ऑस्ट्रेलिया ही धावसंख्या पुर्ण करते की टीम इंडिया हा सामना जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
India vs Australia World Cup Final LIVE Update : टीम इंडियाला पाचवा धक्का, रविंद्र जडेजा आऊट
India vs Australia World Cup Final LIVE Update : टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का
टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली 54 धावावर बाद झाला आहे.
India vs Australia World Cup Final LIVE Update : टीम इंडियाला तिसरा धक्का
- टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर 4 धावावर आऊट झाला आहे.
India vs Australia World Cup Final LIVE Update : टीम इंडियाला दुसरा धक्का
टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा 47 धावावर आऊट झाला आहे.
हे वाचलं का?
India vs Australia World Cup Final LIVE Update : पहिल्या 5 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 37 धावा
पहिल्या 5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने एक विकेट गमावला आहे. शुभमन गिल आऊट झाला आहे. टीम इंडियाने 37 धावा केल्या आहेत.
ADVERTISEMENT
India vs Australia World Cup Final LIVE Update : टीम इंडियाच्या प्लेईंग XI मध्ये कोणताही बदल नाही
🚨 Toss & Team News from Narendra Modi Stadium, Ahmedabad 🚨
Australia have elected to bowl against #TeamIndia in the #CWC23 #Final.
A look at our Playing XI 👌
Follow the match ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/433jmORyB3
— BCCI (@BCCI) November 19, 2023
ADVERTISEMENT
India vs Australia World Cup Final LIVE Update : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस!
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. टॉसच्या अर्धातासानंतर म्हणजेच 2 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
India vs Australia World Cup Final LIVE Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड कप फायनलसाठी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. 140 कोटी भारतीय जनता तुम्हाला चीअर करते आहे. तुम्ही चमकत राहा, तेजस्वी व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा, असा सल्लाही नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला दिल्या आहेत.
All the best Team India!
140 crore Indians are cheering for you.
May you shine bright, play well and uphold the spirit of sportsmanship. https://t.co/NfQDT5ygxk
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023
India vs Australia World Cup Final LIVE Update : वर्ल्ड कप सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
भारत ऑस्ट्रेलिया फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्याबरोबर हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे देखील दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील. तत्पूर्वी, पंतप्रधान राजस्थानमधील तारानगर आणि झुंझुनू येथे सभांना संबोधित करतील आणि त्यानंतर गुजरातला रवाना होतील.
India vs Australia World Cup Final LIVE Update : वर्ल्ड कपची खेळपट्टी आणि अहमदाबादचं हवामान कसं आहे?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीअमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्ड कपचा महाअंतिम सामना रंगणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पावसाने अ़डथळा आणल्यास क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदाबादमधील हवामान कसे आहे? आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे? हे जाणून घेऊयात. सविस्तर वृत्त…
India vs Australia World Cup Final LIVE Update :आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना आज 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याची संपूर्ण देशवासियांना उत्सुकला लागली आहे. हा सामना जिंकून भारत तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. (ind vs aus world cup 2023 final live update narendra modi stadium ahmedabad india vs australia final match rohit sharma pat cummins)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT