Shreyas Iyer: जे सचिनलाही जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं, पदार्पणातच ‘यांनी’ झळकावलंय कसोटी शतक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कानपूर: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने आपल्या कसोटी पदार्पणातच मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस शानदार शतक झळकावत मानाचं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रेयस 105 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे या मुंबईकर खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, ज्या मुंबईने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे महान फलंदाज भारताला दिले त्यांना देखील अशी करामत करता आली नव्हती. जे सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते मुंबईकर श्रेयसने करुन दाखवल्याने आता त्याचं कौतुक केलं जात आहे.

भारतातर्फे आतापर्यंत फक्त दहाच फलंदाज असे आहेत की, ज्यांनी आपल्या पदार्पणातच शतक झळकावलं आहे. पाहा कोण-कोण आहेत हे क्रिकेटर.

हे वाचलं का?

1. शिखर धवन: आपल्या कसोटी क्रिकेट पदार्पणातच शतक झळकवणाऱ्यांमध्ये शिखर धवन याचा नंबर सगळ्यात वर आहे. त्याने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 187 धावा केल्या होत्या. पहिल्याच कसोटी सामन्यात शतक आणि सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड शिखर धवनच्या नावावर जमा आहे.

2. रोहित शर्मा: रोहित शर्माने 2013 साली पहिल्याच कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं होतं. वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 177 धावा केल्या होत्या.

ADVERTISEMENT

3. गुंडप्पा विश्वनाथ: गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1969 साली त्यांच्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 137 धावांची शानदार खेळी केली होती.

ADVERTISEMENT

4. पृथ्वी शॉ: 2018 साली मुंबईकर पृथ्वी शॉ याने टेस्ट डेब्यू करताना वेस्टइंडिजविरुद्ध 134 धावांची शानदार खेळी केली होती. ज्यामुळे पृथ्वी शॉ याने पर्दापणातच शतक झळकवणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं होतं.

5. लाला अमरनाथ: भारत स्वातंत्र होण्याआधी टीम इंडियाचं नेतृत्व करणारे लाला अमरनाथ यांनी 1933 साली आपल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं होतं. यावेळी त्यांनी 118 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

6. दीपक शोधन: 1952 साली दीपक शोधन यांनी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात आणि ते देखील पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्यांनी 110 धावांची खेळी केली होती.

7. मोहम्मद अझहरुद्दीन: टीम इंडियाचा कॅप्टन आणि शानदार फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीन याने 1984 साली पदार्पणातच कसोटी शतक झळकावलं होतं. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 110 धावा केल्या होत्या.

8. हनुमंत सिंह: 1964 साली हनुमंत सिंह यांनी इंग्लंडविरुद्ध खेळताना आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात 105 धावा केल्या होत्या.

Ind vs NZ Test : पदार्पणातच मुंबईकर श्रेयसची शतकी खेळी

9. श्रेयस अय्यर: आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत श्रेयस अय्यरने देखील स्थान मिळवलं आहे. जे मुंबईकर सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर या महान खेळाडूंना जमलं नाही ते यावेळी श्रेयसने करुन दाखवलं आहे. त्याने आज (26 नोव्हेंबर 2011) न्यूझीलंडविरुद्ध 105 धावांची जबरदस्त खेळी केली.

10. कृपाल सिंह: 1955 साली कृपाल सिंह यांनी देखील पदार्पणतच शतक झळकावलं होतं. भारतातर्फे आतापर्यंत जेवढ्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे त्यात कृपाल सिंह हे शतक झळकावून नाबाद राहिलेले एकमेव खेळाडू आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT