IPL Auction 2024 : मल्लिका सागरकडून मोठी चूक, RCB ला बसला ‘इतक्या’ लाखांचा फटका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl auction 2024 ipl auctioneer mallika sagar big mistake alzarri joseph bid in auction 2024 royal challengers bang lore
ipl auction 2024 ipl auctioneer mallika sagar big mistake alzarri joseph bid in auction 2024 royal challengers bang lore
social share
google news

Ipl Auctioneer Mallika Sagar Big Mistake : आयपीएल (IPL) 2024 चा मिनी ऑक्शन लिलाव दुबईत सुरू आहे. यंदाच्या लिलावात प्रथमच एक महिला लिलावदार म्हणून सहभागी झाली आहे. या महिलेचे नाव मल्लिका सागर (Mallika Sagar) आहे. या महिला लिलावदारची खूप चर्चा रंगली होती. आता याच मल्लिका सागरकडून लिलावा दरम्यान मोठी चुक झाली आहे. या चुकीमुळे रॉयल चँलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) मोठं नुकसान झाले आहे. नेमकं आरसीबीचं किती लाखांच नुकसान झाले आहे. हे जाणून घेऊयात. (ipl auction 2024 ipl auctioneer mallika sagar big mistake alzarri joseph bid in auction 2024 royal challengers bangalore)

ADVERTISEMENT

किती कोटीला जोसेफची खरेदी?

अल्झारी जोसेफची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती आणि आरसीबीनेच त्याला 11.50 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. जोसेफ 11.50 कोटी रुपयांसह आयपीएलमधील वेस्ट इंडिजचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त निकोलस पूरन आहे, ज्याला आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

हे ही वाचा : Dawood भारतातून फरार झाला ‘त्या’ रात्रीची कहाणी, मंत्रालयात ‘त्या’ नेत्याला फोन अन्…

जोसेफच्या लिलावा दरम्यान चूक

अल्झारी जोसेफच्या लिलावा दरम्यान मोठी चुक झाली होती. चेन्नई सुपर किंग्जने जोसेफवर बोली लावायला सुरूवात केली होती. ही बोली 3 कोटींवर पोहोचली तेव्हा चेन्नई संघाने माघार घेतली. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स आणि आरसीबीने या लिलावात प्रवेश केला होता. या सर्वांमध्ये बोली सुरूच राहिली, जी पुढे जाऊन 6.40 कोटींवर पोहोचली आणि काही काळ थांबली होती.

हे वाचलं का?

या दरम्यान पुन्हा लिलावाला सुरूवात झाल्यानंतर मल्लिकाकडून मोठी चूक झाली होती. खरं तर बोली ही 6.40 कोटींवर थांबली होती. आणि मल्लिकाने 6.60 वरून पुन्हा लिलावाला सुरवात केली होती. ज्यामुळे ही बोली 6.60 वरून पुढे चालली आणि 11.50 कोटींवर थांबली. त्यानंतर आरसीबीने जोसेफला विकत घेतले, पण त्यांना 20 लाखांचे नुकसान झाले.

हे ही वाचा : Maratha Reservation: सरकारने डेडलाईन धुडकावली?, CM शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

दरम्यान मल्लिकाच्या एका चुकीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र अशा चुका यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. यापूर्वीच्या लिलावातही अशीच चूक झाली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT