Rohit Sharma :…म्हणून मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवलं? सुनील गावस्करांच्या विधानाने खळबळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl auction 2024 sunil gavaskar big statement mumbai indias captaincy change rohit sharma hardik pandya ipl 2024
ipl auction 2024 sunil gavaskar big statement mumbai indias captaincy change rohit sharma hardik pandya ipl 2024
social share
google news

Sunil Gavaskar big statement On Rohit sharma Captaincy : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma)  याला आयपीएलच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या जागी आता हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाचा नवीन कर्णधार बनवले आहे. हार्दिक आधी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता. आता रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. त्यात आता भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करने (Sunil Gavaskar) रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत मोठं विधान केले आहे. या विधानाची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. (ipl auction 2024 sunil gavaskar big statement mumbai indians captaincy change rohit sharma hardik pandya ipl 2024)

ADVERTISEMENT

आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील हंगामात मुंबई इंडियन्स (MI) कडून फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. त्यात रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. मात्र भविष्यासाठी संघाला तयार करण्यासाठी हा नेतृत्व बदल करण्यात आल्याचे दावा मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Lok Sabha: विरोधकांची बोलती बंद, एकाच वेळी 33 खासदार तडकाफडकी निलंबित.. घडलं तरी काय?

मुंबई इडियन्स संघातील या सर्व घडामोडीवर टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्करने प्रतिक्रिया दिली आहे. सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना रोहित शर्मा थोडा थकलेला दिसत होता. रोहित 2022 च्या सुरुवातीपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करत आहे, ज्यामुळे तो थोडा थकला होता,असे गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले.

हे वाचलं का?

‘आपण बरोबर आणि चुकीच्या मध्ये जाऊ नये. पण, त्यांनी घेतलेला निर्णय संघाच्या हितासाठी घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत रोहितचे कर्णधारपदासह फलंदाजीतील योगदान थोडे कमी झाले आहे. पूर्वी तो मोठ्या धावा करायचा, पण गेल्या दोन वर्षांत रोहितला तसे करता आलेल्या नाही आहेत, असे देखील गावस्कर यांनी सांगितले.

हे ही वाचा : Mla Disqualification : “शिंदेंनी तसं केलंच नाही”, ठाकरेंनी नार्वेकरांना काय सांगितलं?

‘आम्ही रोहित शर्मामध्ये जो उत्साह पाहायचो तो दिसत नव्हता. कदाचित, तो सतत क्रिकेट खेळून थोडा थकला होता, तो भारत आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना थकला होता. हार्दिक हा युवा कर्णधार असून त्याने निकाल दिला हे लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे. हार्दिकने गुजरातला दोनदा फायनलमध्ये नेले आणि 2022 मध्ये विजेतेपदही जिंकले, मला वाटते की त्यांनी सर्वकाही विचार करून त्याला कर्णधार बनवले आहे, असे विधान करून मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाच्या निर्णयाचे गावस्कर यांनी स्वागत केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT