IPL Point Table 2025 : मुंबईचा सलग दुसरा पराभव, पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ! गुजरात तिसऱ्या नंबरला, CSK-MI कुठे?
आयपीएल 2025 पॉइंट टेबलमध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच RCB पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीच्या खात्यात 2 सामन्यांनंतर 4 गुण आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB पहिल्या स्थानावर

दुसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स
IPL 2025 Points Table: आयपीएलची सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे. यामध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स कडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आयपीएल पॉईंट टेबल मध्ये मोठे उलथापालट पाहायला मिळाली. आयपीएल मधील पहिल्या पराभवानंतर गुजरात टायटन्सने आपल्या खाते उघडले, मात्र यासह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला दोन सामन्यांनंतर खातेही उघडता आलं नाही. तर पंजाब किंग्जही तिसऱ्या क्रमांकावरून घसरली आहे. पॉइंट टेबलमध्ये इतर संघांचं स्थान काय आहे? हे जाणून घेऊ.
हे ही वाचा >> पंतप्रधान मोदी 2014 नंतर पहिल्यांदा RSS मुख्यालयात, 'या' प्रकल्पांचं करणार उद्घाटन, वाचा यादी...
आयपीएल 2025 पॉइंट टेबलमध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीच्या खात्यात 2 सामन्यांनंतर 4 गुण आहेत. तर नेट रन रेट प्लस 2.266 आहे. त्याच वेळी, दुसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स आहे. लखनऊने दोनपैकी एक सामना जिंकला आहे आणि 0.963 चा रन रेट आहे. तिसऱ्या स्थानावरची पंजाब किंग्सची जागा आता गुजरात टायटन्सने घेतली आहे. गुजरातने दोनपैकी एक सामना जिंकला आहे. या संघाचा नेट रन रेट +0.625 आहे. पंजाब किंग्ज 2 गुण आणि +0.550 नेट रन रेटने चौथ्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्स पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीने फक्त एकच सामना असून, तोही जवळच्या फरकाने जिंकला आहे. DC चा नेट रन रेट +0.371 आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद या यादीत सहाव्या स्थानावर आहे. हैदराबादने 2 पैकी एक सामना जिंकला आहे. पण नेट रन रेट -0.128 वर आला आहे. सातव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. या संघाने दोनपैकी एक सामना जिंकला आहे. KKR चा नेट रन रेट -0.308 आहे.
हे ही वाचा >> पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!
चेन्नई सुपर किंग्ज आठव्या क्रमांकावर आहे. सीएसकेनेही दोनपैकी एक सामना जिंकला असून, सीएसकेचा नेट रन रेटही मायनसवर पोहोचला आहे. CSK चा नेट रन रेट सध्या -1.013 आहे. आठव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने अजून एकही सामना जिंकलेला नाही. नेट रन रेटसुद्धा -1.163 आहे. राजस्थान रॉयल्स शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. राजस्थाननेही दोन्ही सामने गमावले असून नेट रन रेट -1.882 आहे.