IPL 2025: 24 तासांत 3 वेळा 97 नाबादचा आश्चर्यकारक योगायोग, श्रेयस अय्यर आणि...

मुंबई तक

अवघ्या 24 तासात 97 धावांवर नाबाद राहून आपल्या संघाला विजय मिळवून देणारी खेळी ही तीन वेगवेगळ्या फलंदाजांनी आपल्या संघासाठी केली आहे. वाचा ही इंटरेस्टिंग स्टोरी.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shreyas Iyer Quinton De Kock, IPL 2025:  क्रिकेटच्या जगात विचित्र योगायोग घडत राहतात. 25 ते 26 मार्च दरम्यान 24 तासांच्या आत, असा एक आश्चर्यकारक योगायोग घडला की चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. या काळात, म्हणजे 24 तासांत, तीन क्रिकेटपटूंनी त्यांच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले आणि तिघांनीही नाबाद 97 धावांच्या मॅचविनिंग इनिंग्ज खेळल्या.

विशेष म्हणजे नाबाद 97 धावा करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या तीन फलंदाजांपैकी दोघे सामनावीर आणि एक मालिकावीर ठरला. श्रेयस अय्यर, टिम सेफर्ट आणि क्विंटन डी कॉक या फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

हे ही वाचा>> PBKS vs GT: श्रेयस अय्यरला शतकापासून रोखलं पण पठ्ठ्याने पंजाबला जिंकवलं, कोण आहे शशांक सिंग?

प्रथम श्रेयसने गुजरात संघाची केली धुलाई 

यातील दोन खेळी या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील आहेत. याची सुरुवात पहिल्यांदा पंजाब किंग्ज (PBKS) चा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये केली होती, ज्याने गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात नाबाद 97 धावा केल्या होत्या.

हे ही वाचा>> CSK vs MI: मुंबई इंडियन्सच्या 4 दिग्गज फलंदाजांना माघारी पाठवणारा नूर अहमद आहे तरी कोण?

25 मार्चच्या रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रेयसने 42 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या आणि आपल्या संघाला 11 धावांनी विजय मिळवून दिला. पंजाबच्या कर्णधाराने आपल्या वादळी खेळीत 5 चौकार आणि 9 षटकार मारले. 

डी कॉकने कोलकात्याला मिळवून दिला विजय 

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा सलामीवीर क्विंटन डी कॉकने नाबाद 97 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 26 मार्चच्या रात्री राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध झालेल्या या सामन्यात डी कॉकने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. या जोरावर त्याने 61 चेंडूत 97 धावांची नाबाद खेळी केली.

सेफर्टने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली

दुसरीकडे 26 मार्च रोजी न्यूझीलंडच्या टिम सेफर्टने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपले. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात त्याने नाबाद 97 धावा केल्या. आणि त्याच्या किवी संघाला विजयापर्यंत नेले. अशाप्रकारे, 97 नाबादचा हा अद्भुत योगायोग अवघ्या 24 तासात तयार झाला.

सेफर्टने 38 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 10 षटकार मारले. सेफर्टच्या खेळीमुळे न्यूझीलंड संघाने 129 धावांचे लक्ष्य 60 चेंडू आधीच पूर्ण केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp