IND vs PAK : अक्षर पटेलचा परफेक्ट थ्रो अन् इमामचा खेळ खल्लास! रनआऊटचा Video पाहून थक्कच व्हाल
India vs Pakistan, ICC Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगत आहे. आज दुबईच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा महामुकाबला खेळवला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दुबईत रंगलाय भारत-पाकिस्तान महामुकाबल्याचा थरार

अक्षर पटेलच्या परफेक्ट थ्रोमुळे इमामचा गेम खल्लास

रनआऊटचा जबरदस्त व्हिडीओ पाहिलात का?
India vs Pakistan, ICC Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगत आहे. आज दुबईच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा महामुकाबला खेळवला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेले पाकिस्तानचे सलामी फलंदाज इमाम उल हक आणि बाबर आझम स्वस्तात माघारी परतले. परंतु, या सामन्यात इमामचा विकेटस सर्वांच्याच भुवया उंचावणारा ठरला.
कारण भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने परफेक्ट थ्रो करून इमामला रनआऊट केलं. इमामने मिड ऑनला फटका मारून एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, मिड ऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या अक्षर पटेलने अचूक थ्रो करून इमामला रनआऊट केलं आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अक्षरने अप्रतिम फिल्डिंग करून इमामला बाद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> "ती शिवसेना नाही, गद्दारांची सेना, निष्ठावंत शिवसैनिक...", उद्धव ठाकरेंचा DCM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फकर जमान दुखापतग्रस्त झाल्याने इमाम उल हकला संघात संधी मिळाली. आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात इमाम पाकिस्तानला आक्रमक सुरुवात करून देईल, अशी पाकिस्तानच्या चाहत्यांना आशा होती. परंतु, इमामने चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरलं. इमामने या सामन्यात 26 चेंडूत 38.46 च्या स्ट्राईक रेटने फक्त 10 धावाच केल्या. इमाम उल हक ज्यावेळी बाद झाला, तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 9.2 षटकांमध्ये दोन विकेट्स गमावत 47 वर पोहोचली होती.
हे ही वाचा >> Swara Bhaskar : महाकुंभ आणि 'छावा' बद्दलच्या पोस्टमुळे वाद, स्वरा भास्कर स्पष्टीकरण देताना म्हटली...
हार्दिक पंड्यानेही भेदक गोलंदाजी करून बाबर आझमला 23 धावांवर झेलबाद केलं.बाबर आझमने संघाच्या इनिंगच्या सुरुवातीला कव्हर ड्राईव्हला चांगले फटके मारून धावसंख्येचा आलेख वाढवला होता. परंतु, हार्दिकच्या गोलंदाजीवर बाबरने नांगी टाकली. बाबरने एकूण 26 चेंडूंचा सामना करत 88.46 च्या स्ट्राईक रेटने 23 धावा केल्या. या इनिंगमध्ये बाबरने पाच चौकार मारले.