India vs New Zealand : वानखेडेवर आज जिंकण्याचा गोल्डन चान्स, टीम इंडियाच्या फलंदाजांवर सर्वांचं लक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना

point

वानखेडे स्टेडियमवर आज रणसंग्राम

point

सामना जिंकून क्लीन स्वीप टाळायची भारताकडे संधी

India vs New Zealand 3rd Test Day 3 LIVE: भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. आज 3 नोव्हेंबरला या सामन्याचा तिसरा दिवस असणार आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 9 बाद 171 धावा केल्या होत्या. एजाज पटेल नाबात 7 धावा करून क्रीजवर आहे. सध्या न्यूझीलंड संघ 143 धावांनी आघाडीवर असून, त्यांच्याकडे एक विकेट अजूनही शिल्लक आहे. आता आज चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करणार.
 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Raosaheb Danve : महायुतीत मिठाचा खडा, शिंदेंच्या नेत्याला रावसाहेब दानवे औरंगजेब म्हणाले, तर स्वत:ला थेट शिवरायांची उपमा

 

किवींच्या संघाने या सामन्यातील पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात भारताने पहिल्याच डावात 263 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावानुसार भारत 28 धावांनी आघाडीवर होता. भारतीय संघाने आधीच मालिका गमावलीये. त्यामुळे आता हा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळायची शेवटची संधी असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्रतेच्या दृष्टीनेही हा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Mazi Ladki Bahin Yojana: गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार १५०० रुपये

 

भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूमध्ये खेळला गेला होता, त्यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव झाला होता. त्यानंतर पुण्यात खेळल्या गेलेला मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंडने 113 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली. तर आता आज या मैदानावर किवींचा संघ चौथी कसोटी खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडने या मैदानावर जे तीन सामने खेळले होते, त्यात  एका सामन्यात  विजय तर दोन सामने गमवावे लागले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT