LSG vs DC: हरलेला सामना जिंकून दिला, कोण आहे आशुतोष शर्मा ज्याने लखनऊच्या विजयाचा घास घेतला हिरावून

मुंबई तक

IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रोमांचक सामन्यात दिल्लीने थरारक विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला तो आशुतोष शर्मा. जाणून घ्या कोण आहे आशुतोष.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Who is Ashutosh Sharma: IPL 2025 मधील एक रोमांचक सामना आज  (24 मार्च) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर रंगला. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या या थरारक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरस कायम ठेवत 1 गडी राखून विजय मिळवला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 209 धावा केल्या, तर दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 211 धावा करत हा सामना जिंकला. या सामन्यात दिल्लीचा युवा खेळाडू आशुतोष शर्मा हा विजयाचा नायक ठरला. 

सामन्याचा रोमांच

दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर लखनऊ सुपर प्रथम फलंदाजीना करताना निकोलस पूरन (75 धावा) आणि मिचेल मार्श (72 धावा) यांनी संघाला 209 धावांपर्यंत पोहोचवलं. दिल्लीच्या गोलंदाजांपैकी मिचेल स्टार्कने 3  घेत लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं, तर कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा>> CSK vs MI: मुंबई इंडियन्सच्या 4 दिग्गज फलंदाजांना माघारी पाठवणारा नूर अहमद आहे तरी कोण?

प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 65 धावांवरच दिल्लीने आपले 5 गडी गमावले. दरम्यान, शेवटच्या 5 षटकांत 60 धावांची गरज असताना सामना लखनऊच्या बाजूने झुकताना दिसत होता. पण याच वेळी आशुतोष शर्माने मैदानावर पाऊल ठेवलं आणि खेळाचं चित्र बदललं. त्याने 31 चेंडूंमध्ये 66 धावांची नाबाद खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. शेवटचा फलंदाज शिल्लक असतानाही आशुतोषने अतिशय जिगरबाज फटकेबाजी करत दिल्लीला एक हाती विजय मिळवून दिला.

कोण आहे आशुतोष शर्मा?

आशुतोष शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख खेळाडू आहे, जो आपल्या आक्रमक फलंदाजी आणि दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. त्याचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. डावखुरा फलंदाज असलेला आशुतोष मधल्या आणि खालच्या फळीत फिनिशरची भूमिका प्रभावीपणे निभावतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि रेल्वेसाठी खेळताना आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

आशुतोषला खरी ओळख मिळाली ती 2023 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये. या स्पर्धेत त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून युवराज सिंगचा 16 वर्षांचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये त्याने पंजाब किंग्सकडून पदार्पण केलं आणि आता दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना त्याने आपली क्षमता दाखवली आहे. आशुतोषने आपल्या मेहनतीने क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे.

हे ही वाचा>> IPL 2025: 45 चेंडूत शतक ठोकणारा ईशान किशन आहे तरी कोण.. त्याची 'ही' गोष्ट तुम्हाला माहितीए?

सामन्यातील आशुतोषची भूमिका

या सामन्यात आशुतोष शर्माने 31 चेंडूंमध्ये 66 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेटही तब्बल 212  होता. जेव्हा दिल्ली 16 षटकांनंतर 168/7 अशी बिकट अवस्थेत होती, तेव्हा आशुतोषने आक्रमक फलंदाजी करत लखनऊच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने रवि बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत  संपूर्ण सामन्याचा नूरच बदलून टाकला. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने थेट षटकार मारत दिल्लीला रोमांचक विजय मिळवून दिला.

सामन्याचा टर्निंग पॉइंट

आशुतोष शर्माची ही खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्याने दाखवलेला संयम आणि आक्रमकता यामुळे दिल्लीने हा अटीतटीचा सामना जिंकला. लखनऊच्या गोलंदाजांना शेवटच्या षटकांत त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही, आणि हेच त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं.

दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह आयपीएल 2025 मध्ये आपली विजयी सुरुवात केली आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली संघाने संतुलित खेळ दाखवला, तर आशुतोष शर्माने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत सर्वांचं लक्ष वेधलं. आशुतोष शर्मा हा दिल्लीसाठी एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, हे या सामन्याने दाखवून दिलं. पुढील सामन्यांमध्येही त्याच्याकडून अशाच थरारक खेळींची अपेक्षा क्रिकेटप्रेमी नक्कीच बाळगून आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp