Asian Games 2023: शिंदे-फडणवीसांनीही कौतुक केलेली पारुल चौधरी आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

asian games 2023 parul chaudhary farmer daughter created history by winning gold medal in china
asian games 2023 parul chaudhary farmer daughter created history by winning gold medal in china
social share
google news

Asian Games: पारुल चौधरी (Parul Chaudhary) या एका शेतकऱ्याची मुलीने मंगळवारी भारतासाठी दुसरे सुवर्णपदक (gold medal) जिंकत नवा इतिहास रचला आहे. तिच्या या सुवर्ण पदकाने भारतीयांची मान मात्र उंचावली आहे. त्यामुळे भारतातील सगळा सोशल मीडिया आता तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. मेरठची ॲथलीट (athlete) कन्या पारुल चौधरी आपल्या चमकदार कामगिरीमुळे ती सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड (Track and Field) स्पर्धेतील तिच्या सुवर्णपदक कामगिरीने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची दाद

मंगळवारी पारुलने 5000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी सोमवारी पारुलने 3000 मीटरमध्येही रौप्यपदक पटकावले होते. तिच्या या यशानंतर सोशल मीडियावर तिचे कौतुक होत असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावरुन तिचे अभिनंदन करत तिच्या प्रयत्नामुळे भारताची मान उंचावली असून जगात चमकला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा >> Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन

पारुलने चकित केले

पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रथम स्थान पटकावून तिने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्यामुळे आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताला 14 वे सुवर्णपदक मिळाले आहे. तिने काल संध्याकाळी महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक पटकावले होते, परंतु यावेळी तिने शेवटच्या काही मीटरमध्ये वेग वाढवून प्रतिस्पर्धकालाही चकित केले आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

हे वाचलं का?

छोट्या गावातून मोठी कामगिरी

मेरठमध्ये राहणाऱ्या कृष्णपाल सिंग यांची पारुल चौधरी ही मुलगी. शेतकरी कुटुंबीत वाढली असली तरी तिने भारतासाठी केलेली सुवर्ण कामगिरी ही चमकदार राहिली आहे. पारुलने सुवर्णपदक मिळवताच मेरठ आनंदात न्हाऊन निघाले. अनेक लोकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. काल तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिचे घर लोकांनी भरुन गेले होते. यावेळी साऱ्या गावाने मिठाई वाटून आनंद साजरा केला.

ADVERTISEMENT

नावलौकिक जगभरात

मेरठमधील एका छोट्या गावातून आलेल्या कृष्णपाल सिंह यांच्या पारुल चौधरीने सुवर्ण मिळवताच भारताचा नावलौकिक जगभरात झाला आहे. छोट्या गावातून आलेली आणि शेती करणाऱ्या बापाच्या मुलीने देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याने अनेकांना याचा अभिमान वाटत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>‘…अन् एकनाथ शिंदे रडायला लागले’, आदित्य ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?

बहिणींचाही दबदबा

पारुल चौधरी वडील कृष्णपाल सिंह शेती करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मोठा मुलगा राहुल दिवाण टायर कारखान्यात काम करतो तर दुसरी मुलगी प्रीती क्रीडा कोट्यातून सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक आहे. पारुल चौधरी तीन नंबरची आहे. ती ते रेल्वेत आहे. तर चौथा मुलगा रोहित यूपी पोलिसात कार्यरत आहे. पारुल आणि प्रीतीने भरालामधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मेरठच्या मेरठ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. पटियालाला गेल्यानंतर मात्र तिने विद्यापीठ पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.

बहिणीबरोबरच स्पर्धा

पारुल चौधरीने भरळमधील इंटर कॉलेजमधून मोठी बहीण प्रीती चौधरीसोबत धावण्याच्या स्पर्धे भाग घेतला होता. प्रारंभीच्या काळात पारुलच्या मोठ्या बहिणीशीच तिची स्पर्धा होती. त्यावेळी त्या दोघांनीही 1600 आणि 3 हजार मीटरमध्ये धावायला सुरुवात केली होती.

हे ही वाचा >> आधी वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता पत्नीकडूनही… शिखर धवनच्या आयुष्यात मोठं वादळ

कुटुंबाचा सल्ला

पारुल चौधरीच्या अंतिम निवडीवेळी मात्र तिच्या कुटुंबीयांनी 5 हजार मीटर धावण्यासाठीच तिला सल्ला दिला. त्यानंतर तिने आपल्या क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही. हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यश आले नसले तरी ती ऑलिम्पिकसाठी मात्र पात्र ठरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT