Video:  6 6 6 6 6 6...रॉबिन उथप्पाची केली धुलाई! 'या' धडाकेबाज फलंदाजाने सहा चेंडूत ठोकले सहा षटकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ravi Bopara Smashes Six Sixes
Ravi Bopara Smashes Six Sixes Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' फलंदाजाने रॉबिन उथप्पाच्या गोलंदाजीवर ठोकले सहा षटकार

point

एकाच षटकात सहा षटकार ठोकणारा ठरला 11 वा खेळाडू

point

'त्या' फलंदाजाच्या वादळी खेळीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Ravi Bopara Smashesh Six Sixes In An Over: इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर रवी बोपाराने इतिहास रचला आहे. रवी बोपारा एकाच षटकात सहा षटकार ठोकणारा जगातील 11 वा खेळाडू बनला आहे. 30 वर्षाच्या या अष्टपैलू खेळाडूने ऐतिहासिक कारनामा करून सर्वांच्याच भुवया उंचावून टाकल्या आहेत. बोपाराने हा मोठा कारनामा हाँगकाँग इंटरनॅशनल सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारता विरुद्ध झालेल्या सामन्यात केला. 

ADVERTISEMENT

भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने या इनिंगचं चौथं षटक फेकलं. परंतु, आक्रमक फलंदाज रवी बोपाराने उथप्पाच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडला. बोपाराने सुरुवातीच्या पाच चेंडूत पाच गगनचुंबी षटकार ठोकले. त्यानंतर उथप्पाने सहावा चेंडू वाईड फेकला. त्यानंतर बोपाराने शेवटच्या चेंडूवरही षटकार ठोकून विक्रमाला गवसणी घातली.

हे ही वाचा >> Shahrukh Khan Birthday: सर्वात आश्चर्यकारक Video आला समोर, किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यासमोर घडलंय तरी काय?

रवी बोपाराने 14 चेंडूत कुटल्या 53 धावा

सामन्यात रवी बोपाराने धडाकेबाज फलंदाजी करून संघासाठी मोठी धावसंख्या रचली. या इनिंगमध्ये त्याने 378.57 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा (रिटायर्य हर्ट) ठोकल्या. या इनिंगमध्ये बोपाराने एकूण ८ षटकार मारले.

समित पटेलनेही ठोकलं आक्रमक अर्धशतक

भारता विरुद्ध झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू समित पटेलनेही धडाकेबाज फलंदाजी केली. त्यानेही सलामीला फलंदाजी करून 18 चेंडूत 283.33 च्या स्ट्राईक रेटने 51 धावा (रिटायर्ड हर्ट) कुटल्या. पटेलच्या या तुफानी खेळीत 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम? खात्यात कधी येतील 1500?

एका षटकात सहा षटकार ठोकणारे खेळाडू

  • सर गॅरी सोबर्स​ 
  • ​रवी शास्त्री​ 
  • ​हर्षल गिब्ज 
  • ​युवराज सिंग 
  • ​रॉस व्हाइटली​ 
  • ​हजरतुल्लाह जजई​ 
  • ​लियो कार्टर​
  • कायरन पोलार्ड 
  • थिसार परेरा 
  • जसकरण मल्होत्रा 
  • ऋतुराज गायकवाड 
  • रवी बोपारा 
 

 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT