Beed Crime News : बीडमध्ये चाललंय तरी काय? अजित पवार NCP च्या माजी नगरसेविकेच्या पुत्रानं कर्मचाऱ्याला मारलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नगर परिषद कर्मचाऱ्याला मारहाण...

point

अजित पवारांच्या नगरसेवकावर आरोप

point

कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा

Beed Crime News : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे कायदा व सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे लख्तरं वेशीवर टांगले आहेत. अशातच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. परळी नगरपरिषद कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली आणि जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद नगर परिषद कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही सध्या चांगलंच व्हायरल होतंय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: "वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं...", जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड (वय 30 वर्ष) हे नगर परिषद कर्मचारी असून, MIS स्पेशलीस्ट आहेत. परळी नगर परीषदेत शासकीय कामकाज करत असताना आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीला कामकाजाबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. तसंच मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला. तक्रारीवरुन अन्वर मीश्कीन शेख, शेख अजीज इस्माईल, शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसमांविरुद्ध पोलिसांकडून 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),3(5) BNS सह कलम 3(1) (r) (s), 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास मा. उपवीभागीय पोलीस अधिकारी चार्ज गेवराई  नीरज राजगुरु हे करीत आहेत.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: धनंजय मुंडेंनी थेट केली फाशीची मागणी, वाल्मिक कराडबद्दल काय म्हणाले?

दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश असलेले लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असून अन्वर मिश्कीन शेख हे माजी नगरसेवक आहेत तर दुसरा एक आरोपी शेख अजीज इस्माईल हे  माजी नगरसेविकेचे पुत्र आहेत. त्यामुळे आता याप्रकरणावरुन कोण अडचणीत येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT