IPL 2023: ‘येत्या आयपीएमध्ये…’, ऋषभ पंतबद्दल सौरभ गांगुलीचं महत्त्वाचं भाष्य
%%excerpt%% भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातातून हळूहळू सावरत आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याबद्दल आता दिल्ली कॅपिटल्स क्रिकेट संचालक सौरव गांगुलींनी नवी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातातून हळूहळू सावरत आहे. ऋषभचा कार अपघात झाला होता, ज्यात त्याला गंभीर मार लागला होता. ऋषभवर शस्त्रक्रियाही करण्यात आली असून, तो कधीपर्यंत पुनरागमन करेल, याची त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याबद्दल आता दिल्ली कॅपिटल्स क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने नवी माहिती दिली आहे. सौरभ गांगुलीने सांगितलं की, ‘ऋषभ पंतने स्वत:ला सावरण्यासाठी पूर्ण वेळ घ्यावा. अपघातामुळे झालेल्या जखमा पूर्णपणे बऱ्या करण्यावर भर दिला पाहिजे.’
ADVERTISEMENT
दिल्ली कॅपिटल्सचा टीम संचालक म्हणून असलेल्या गांगुलीने ऋषभबद्दल भाष्य केलं. गांगुली म्हणाला, ‘भारतीय संघालाही त्यांची उणीव भासेल. तो तरुण आहे आणि अजून त्याचं भरपूर करिअर बाकी आहे. तो एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याने अपघातातून सावरण्यासाठी वेळ द्यावा. आमच्या सदिच्छा त्याच्यासोबत आहेत. मी त्याला भेटणार आहे. येत्या आयपीएमध्ये दिल्ली कॅपिटल्सला नक्कीच कमी जाणवेल.’
Uddhav Thackeray : “भाजप मिंधेंच्या नेतृत्वात लढणार का? हिंमत असेल तर…” ठाकरेंनी दिलं आव्हान!
सौरव गांगुलीने IPL 2023 ला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संघाच्या प्री-सीझन शिबिरात सर्व खेळाडूंना फिटनेसवर लक्ष देण्याबद्दल सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या केसला वेगळं वळण; आधी खटला नंतर…
कार अपघातामुळे झालेल्या जखमांमधून ऋषभ पंत सावरत असून, तो सातत्याने त्याच्या चाहत्याने अपडेट देत असतो. आता त्याने हालचाल करायलाही सुरूवात केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संवाद करत असतो. अपघातानंतर ऋषभ पंतला अनेक आजी-माजी खेळाडू भेटत आहेत.
Uddhav Thackeray : सावरकरांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?
दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद परदेशी खेळाडूकडे
सौरव गांगुलीने दिलेल्या या बातमीनंतर ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे. याआधी तो सनरायझर्स संघाचा कर्णधार राहिलेला आहे. वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपदही मिळवून दिले आहे. डेव्हिड वॉर्नर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असणार असून, यावर सौरव गांगुली म्हणाला की, ‘डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याने खूप धावा केल्या आहेत आणि तो खूप अनुभवी देखील आहे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT