Shikhar Dhawan: क्रिकेटमध्ये उंच 'शिखर' गाठलेल्या धवनने घेतला सर्वात मोठा निर्णय
Shikhar Dhawan Retires From International And Domestic Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार डावखुरा फलंदाज शिखर धवन म्हणजे 'गब्बर'ने आज सकाळी ७.३० वाजता ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिखर धवनची ट्वीटर पोस्ट होतेय व्हायरल
शिखर धवनने घेतला सर्वात मोठा निर्णय
टीम इंडियाचा स्टार खेळाडू 'गब्बर'च्या चाहत्यांना धक्का
Shikhar Dhawan Retires From International And Domestic Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार डावखुरा फलंदाज शिखर धवन म्हणजे 'गब्बर'ने आज सकाळी ७.३० वाजता ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मैदानात भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा शिखर आता आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना दिसणार नाही. कारण शिखरने या दोन्ही फॉर्मेटमध्ये निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
शिखर धवनने ट्वीटरवर केला व्हिडीओ शेअर
शिखरने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत निवृत्तीबाबत माहिती दिली. शिखर धवन आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जसाठी खेळला होता. परंतु, दुखापतीमुळं शिखरला या आयपीएल हंगामात अनेक सामन्यांना मुकावं लागलं. शिखर आयपीएल २०२५ च्या हंगामात क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्येही शिखर धवन निवृत्ती घेणार का?
कारण शिखर या व्हिडीओत आयपीएलच्या निवृत्तीबाबत बोलला नाहीय.शिखरने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं, मी माझ्या क्रिकेटच्या प्रवासातील या पर्वाला समाप्त करत आहे. माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद...
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शिखर धवनने १ मिनिट १७ सेकंदाच्या या व्हिडीओत म्हटलंय की, तुम्हाला सर्वांन नमस्कार, आज एका अशा परिस्थितीसमोर उभा आहे, तेथून मागे पाहिल्यावर फक्त आठवणीच दिसतील आणि पुढे पाहिल्यावर संपूर्ण जग...भारतासाठी खेळणं हेच माझं स्वप्न होतं. ते पूर्णही झालं. यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्वात आधी माझं कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हाजी, मदन शर्माजी, यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटचे धडे गिरवले. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.
ADVERTISEMENT