Team India Victory Parade : क्रिकेटप्रेमींच्या गर्दीत अडकला टीम इंडियाचा विजयरथ, कधी निघणार परेड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 team india victory parade marin drive to wankhede stadium team india bus stuck in mumbai traffic
टीम इंडियाची बस ट्रॅफिकमध्ये अडकली
social share
google news

Team India Victory Parade, Marine Drive to Wankhede Stadium : टीम इंडियाने तब्बल 7  धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. टीम इंडियाने तब्बल 13 वर्षानंतर हा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतभर सूरू आहे. त्यात मुंबईत आज विजयी खेळाडूंची विजयी परेड काढण्यात येत आहे. या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मुंबईत तुफान गर्दी केली आहे. या गर्दीमुळेच टीम इंडियाची बस ट्रॅफिरसमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विजयी परेड काढण्यात उशीर होणार आहे. team india victory parade marin drive to wankhede stadium team india bus stuck in mumbai traffic)   

ADVERTISEMENT

टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता संपूर्ण संघ मुंबईसाठी रवाना झाला होता. या खेळाडूंची मुंबईतील नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअम अशी विजयी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी दुपारपासून मुंबईतील नरीमन पॉईंट आणि वानखेडे स्टेडियमध्ये तुफान गर्दी केली आहे. मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर लोकच लोक दिसतातय. त्यामुळे क्रिकेटप्रेंमींची मोठी गर्दी जमली आहे. 

हे ही वाचा : 'मी कोणताही पक्ष बदललेला नाही', अजित पवार अचानक असं का म्हणाले?

मरिन ड्राईव्ह परिसरातील या तुफान गर्दीमुळे टीम इंडियाचा विजयरथही ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयी रॅलीला उशीर होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

मुंबईतील रस्ते तर रस्ते वानखडे स्टेडियमजदेखील खचाखच भरला आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली आहे. 

हे ही वाचा : माझी लाडकी बहीण योजना: तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर..

दरम्यान भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून 4 जुलै रोजी मायदेशी परतला. देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्पेशल ‘चॅम्पियन’ जर्सी घातलेल्या खेळाडूंबरोबर फोटोही क्लिक केले. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT