IND Vs PAK: भारत-पाक सामन्याला उरले अवघे काही तास, ‘इथे’ पाहाता येईल Free सामना

रोहित गोळे

ADVERTISEMENT

world cup 2023 when and where to watch india vs pakistan match only a few hours left for the match know what to do if you want to watch it for free
world cup 2023 when and where to watch india vs pakistan match only a few hours left for the match know what to do if you want to watch it for free
social share
google news

ICC World Cup 2o23 IND vs PAK Free Live Streaming: भारत आणि पाकिस्तानचे संघ हे उद्या (14 ऑक्टोबर) आमनेसामने असतील. ICC विश्वचषक 2023 चा सर्वात महत्वाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. कोट्यवधी लोक या सामन्याची वाट पाहत आहेत. यामध्ये दोन्ही देशांचे नागरिकच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते आहेत. (world cup 2023 when and where to watch india vs pakistan match only a few hours left for the match know what to do if you want to watch it for free)

ADVERTISEMENT

या दोन्ही संघांनी विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. दोघांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला. यानंतर श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने शानदार शतक झळकावले होते.

तर पहिल्या सामन्यात भारताने पाच वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. यानंतर एकतर्फी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने 131 धावांची शानदार खेळी केली. म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्येही ही स्पर्धा चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलं का?

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? (India vs Pakistan Weather Report)

Ahmedabad Weather Report: अहमदाबादमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. सूर्य निघेल आणि हवामान उष्ण असेल. तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात हेड टू हेड (India vs Pakistan Head to Head record)

भारत आणि पाकिस्तान संघांचा वर्ल्डकप रेकॉर्ड एकतर्फी आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण सात सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ind vs Pak : मोहम्मद शमी इन, ‘हा’ खेळाडू आऊट… पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये फेरबदल?

भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India Playing XI vs Pakistan)

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ADVERTISEMENT

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Pakistan Playing XI vs India)

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी.

Free लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना कधी होणार आहे?

– आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

ICC विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार आहे?

– ICC Cricket World Cup 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक दुपारी दीड वाजता होईल.

हे ही वाचा>> Shubman Gill Health : शुभमन पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? समोर आले महत्त्वाचे अपडेट

ICC विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोणत्या मैदानावर होणार आहे?

– World Cup 2o23 India vs Pakistan Venue: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) खेळवला जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC विश्वचषक सामना कोठे प्रसारित केला जाईल?

– World Cup 2o23 India vs Pakistan Live Channel: आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी विश्वचषक सामना फ्री ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

– India vs Pakistan Free Live Streaming: ICC विश्वचषक 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना Disney + Hotstar च्या अॅप आणि वेबसाइटवर स्ट्रीम केला जाईल. मोबाइलवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT