Pune : पुण्यात रविवारी एका चहाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चहाच्या दुकानात कामाचा या तरूणाचा पहिलाच दिवस होता. त्याच दिवशी ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे. धनकवडी, के के मार्केट परिसरात असलेल्या चहाचं दुकान या स्फोटात जळून खाक झालं. तर बाजूच्या अस्थापनांचंही नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Weather 31st March : राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
दुपारी आग लागल्याची अग्मिशमन दलाला माहिती
धनकवडी, के के मार्केट याठिकाणी दुपारी 4:15 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. एक कामगार अडकला असल्याचं समजताच पाण्याचा मारा केला गेला. अग्निशमन दलाना शर्थीचे प्रयत्न करुन तरूणाला जखमी अवस्थेत बाहेर काढलं. या तरूणाला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुकानात होते 8 सिलेंडर...
शेजारी असलेल्या दोन दुकानांनाही आगीची झळ बसून काही प्रमाणात नुकसान झालं. वेळीच आग आटोक्यात आणल्यानं आग इतरञ पसरली नाही, त्यामुळे धोका टळला. या आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळालं. प्राथमिक माहितीनूसार दुध तापवताना वायूगळती झालेल्या सिलेंडरमुळे आग लागली. धक्कादायक म्हणजे या दुकानात एकुण आठ सिलेंडर होते. यापैकी तीन सिलेंडरमधून वायुगळती झाली असल्याचं दिसतंय. या आगीत गंभीररित्या होरपळलेल्या तरूणाला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा >> 'WhatsApp वर इतिहास वाचू नका..' राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून थेट...
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दुकानात ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरमधून गॅसची गळती झाल्यानं ही घटना घडली असावी, असा संशय आहे. मात्र, आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली. आग पुन्हा भडकू नये म्हणून, दुकानात कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन विभागाने दुकानदार आणि स्थानिक लोकांना आग प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
