Pimpri Chinchwad Bus Fire : रोजच्या सारखंच उठून कामाला निघालेल्या पुण्यात 14 कर्मचाऱ्यांसाठी बुधवारचा (19 मार्च) दिवस थोडा वेगळा होता. होमा प्रिंटिंग प्रेस कर्माचारी कामाला निघाले, पण रस्त्यातच घात झाला. गाडी पेटली, ड्रायव्हरने उडी घेतली आणि गाडी पुढे जाऊन सिमेंट ब्लॉकला धडकली. यावेळी काहींनी पटापट उतरण्याचा प्रयत्न केला, तर काहीजण आतच अडकून होरपळून दगावले. भीषण आगीत होरपळलेल्या मृतदेहांचे दृष्य पाहून महाराष्ट्र हळहळला. मात्र, आणखी धक्कादायक बाब म्हणजे, याप्रकरणात आता वेगळेच खुलासे झाले आहेत.
ADVERTISEMENT
अपघात नाही, सुनियोजित कट?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथे होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. मात्र, ही आग लावण्यात आली होती. मालकाने पगार कापल्याच्या रागातून, बस चालकाने हे कृत्य केलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच हा प्रकार समोर येऊ नये म्हणून ड्रायव्हरने गाडी जाळण्याचा प्लॅन आधीच बनवला असल्याचं कळलं आहे.
हे ही वाचा >> अंतराळातून परतलेल्या सुनिता विल्यम्स चालणं विसरतील का?
जळालेल्या बसच्या चालकाचं नाव आहे जनार्दन हंबर्डीकर. पोलिसांकडून मिळालेल्या आलेल्या माहितीनुसार, जनार्दन हा तणावात होता. तणावाचं कारण होतं सहकाऱ्यांसोबतचे वाद, कुटुंबातील वाद. यामुळे तो कंटाळला होता. याच भावनेतून त्यानं हे कृत्य केलं आहे.
जनार्दनने कसा रचला कट?
जनार्दनने घटनेच्या आधीच्या दिवशीच असा संपूर्ण प्लॅन रचला होता. गाडी पेटवण्यासाठी त्यानं होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीतूनच काही केमिकलच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या. तसंच कपड्याच्या चिंध्याही गोळा करुन गाडीत ठेवल्या होत्या.
19 तारखेला सकाळी जनार्दन कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी गेला. जवळपास 14 लोक गाडीत बसलेले असताना, गाडी पिंपरी चिंचवड फेज वनपर्यंत पोहोचलेली होती. गाडी तिथे येताच, जनार्दनने ठरल्याप्रमाणे काडी पेटवली, आग लावली. आग लागताच भडका उडाला, जनार्दन त्यापूर्वीच खाली उतरलेला होता. यावेळी समोरच्या भागात असलेले कर्मचारी पटकन खाली उतरले. मात्र, मागे बसलेले 4 लोक होरपळून दगावले. याप्रकरणात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली घटना...
गाडी पेटवण्याच्या काही क्षण आधीचे दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मदत झाली आहे. या घटनेनंतर मोठा संताप निर्माण झाला असून, रोज कामासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
