Pune Crime News : पुण्यात रोज एक गुन्हेगारीची नवी घटना समोर येत आहे. मागच्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी मोशीमध्ये एका खाणीत एका शीर नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> आईच्या प्रियकरानेच केला 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, दिवसभर घरी असताना अनैसर्गिक कृत्य
पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर सिद्धाराम ढाले (45) असं मृताचं नाव असून, तो अर्थ मुव्हींग मशीन ऑपरेटर होता. पुण्यातील भोसरी परिसरात राहणारे ढाले 29 मार्चपासून बेपत्ता होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाले यांची पत्नी आणि कुटुंबीयांनी मृतदेहावर असलेल्या कपड्यांवरून त्यांची ओळख पटवली. या घटनेत हल्लेखोर फक्त मान कापून थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तळ हात आणि दोन्ही तळ पाय कापून टाकले होते.
मृतदेहाचं शीर सापडेना
दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचं डोकं आणि शरीराचे इतर अवयव सापडलेले नाहीत. मोशीच्या खाणीत हा मृतदेह पडलेला आहे असं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं होतं. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाजवळ एक मोबाइल फोन आढळून आला.
हे ही वाचा >> एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?
पुण्यातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या लोकांच्या तक्रारीची तपासणी केली. यादरम्यान 31 मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत याच व्यक्तीचा उल्लेख असल्याचे समोर आलं.
कुणाशीही वैर नसल्याचं पत्नीचं म्हणणं...
मृत सिद्धाराम ढाले यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, 29 मार्च रोजी ते कामासाठी घरून निघाले होते. मात्र, घरी परत आले नाही. दोन दिवस वाट पाहिल्यानंतर त्यांनी 31 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पत्नीने असंही सांगितलं की, तिचा नवरा दारू पितो, पण त्याचं कोणाशीही वैर नव्हतं.
दरम्यान, सध्या पोलीस हत्येचं कारण आणि आरोपींचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. लवकरच हत्येचं गूढ उकलण्याचा दावा पोलिस करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
ADVERTISEMENT
