Maharashtra Weather : मुंबई, रायगडसह कोकणात उसळणार उष्णतेच्या लाटा! तर काही जिल्ह्यांत असेल कोरडं हवामान

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांत उष्णतेसह वादळी वारा अन् पावसाच्या सरी कोसळल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी उष्ण व दमट, कोरड्या हवामानाची स्थिती होती.

Maharashtra Weather Today (फोटो - AI)

Maharashtra Weather Today (फोटो - AI)

मुंबई तक

07 Apr 2025 (अपडेटेड: 07 Apr 2025, 10:00 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात असेल उष्ण आणि दमट हवामान?

point

कोणत्या जिल्ह्यात असणार कोरडं हवामान?

point

राज्यातील आजचं हवामान जाणून घ्या

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांत उष्णतेसह वादळी वारा अन् पावसाच्या सरी कोसळल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी उष्ण व दमट, कोरड्या हवामानाची स्थिती होती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आयएमडीने नुकतीच वर्तवली होती.

हे वाचलं का?

तसच काल रविवारी 6 एप्रिलला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होत. सिंधुदुर्गमध्ये हलकं पाऊस, तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसरात कोरड्या हवामानाची शक्यता होती. दरम्यान, आज 7 एप्रिलला राज्यात हवामान कसं असणार आहे? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

हे ही वाचा >> Dharashiv : शिंदे कॉलेजच्या फेअरवेलमध्ये 'त्या' विद्यार्थीनीचा अचानक झाला मृत्यू! भाषण सुरु असताना काय घडलं?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या लाटा उसळत आहेत. आज आणि उद्या अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मुंबई परिसर, विदर्भ आणि खान्देशात उष्णतेचा जोर वाढण्याची तीव्र शक्यता आहे. 

हे ही वाचा >> "मित्रांना हा व्हिडीओ व्हायरल करा" म्हणत तरूणानं इमारतीवरुन उडी घेत स्वत:ला संपवलं, तपासात काय समोर आलं?

    follow whatsapp