बुलढाणा, अमरावती : दोन भीषण अपघातांमध्ये 11 जण जागीच गतप्राण झाले. दोन्ही घटनांमध्ये 27 प्रवाशी जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पहिल्या घटनेत पुण्याहून मेहकरच्या दिशेने निघालेल्या एसटी बस आणि कंटेनरचा अपघात झाला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. दुसरी घटना अमरावती जिल्ह्यात घडली असून, ट्रकने टाटा एस गाडीला धडक दिल्यानं हा अपघात घडला. (buldhana amravati accident news today : 11 people died in the two accident incident in maharashtra.)
ADVERTISEMENT
किनगाव राजा गावाजवळ पहाटे 5 ते 6 वाजताच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसचा अपघात घडला. पुण्याहून मेहकरकडे निघालेल्या एसटी बसची आणि कंटेनरची भीषण धडक झाली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती की, कंटेनरच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
Buldhana Accident : अर्धी बस चिरली…
समोरून आलेल्या भरधाव कंटनेरच्या धडकेत एसटी बसचा अर्धा भाग चिरला गेला. यात 6 प्रवासी जागीच ठार झाले, तर 21 जण जखमी झाले. मृतांमध्ये कंटेनर चालक आणि वाहकाचाही समावेश आहे. अपघातातील जखमींना जालना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा >> Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने का फटकारलं?
गेल्या 24 तासांतील जिल्ह्यातील हा दुसरा भीषण अपघात आहे. 22 मे रोजीच शेगाव शहरात सकाळी 6 वाजता गजानन भक्तांच्या क्रूझर गाडीचा अपघात झाला होता. त्यात तीन भाविकांना प्राण गमवावे लागले.
Amravati Accident : टाटा एस-ट्रकचा अपघात, 5 जणाचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात 5 जणाचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले.
टाटा एसमध्ये बसून 12 जण प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने टाटा एसला जबर धडक दिली. यात 5 जणाचा मृत्यू झाला.
हेही वाचा >> Nagpur : मायलेकराचा भयंकर शेवट! मुलाने संपवलं आयुष्य, आईनेही घेतलं विष
जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले आहे.
यात लहान मुलाचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलविले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करताहेत.
ADVERTISEMENT