83 वर्षाची बायको आणि 37 वर्षाचा नवरा! लग्नाच्या 2 वर्षानंतर सांगितली धक्कादायक गोष्ट

मुंबई तक

24 Jul 2023 (अपडेटेड: 24 Jul 2023, 04:31 PM)

प्रेमाखातर 83 वर्षीय ब्रिटीश महिला आयरीस जोन्स इजिप्तमधील मिस्र शहरात पोहोचली आहे. आयरीस जोन्सने 37 वर्षीय मोहम्मद इब्राहिमसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या नात्याला आता 2 वर्ष पुर्ण झाली आहेत.

83 year old women married 37 year old husband now share shocking update

83 year old women married 37 year old husband now share shocking update

follow google news

प्रेमप्रकरणातून आजकाल देशाच्या सीमा ओलांडण्याचे प्रकार हमखास सुरु आहेत. पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) असो किंवा भारताची अंजू या दोघींनीही देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. या दोघींसह आता प्रेमाखातर 83 वर्षीय ब्रिटीश महिला आयरिस जोन्स इजिप्तमधील मिस्र शहरात पोहोचली आहे. आयरिस जोन्सने 37 वर्षीय मोहम्मद इब्राहिमसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या नात्याला आता 2 वर्ष पुर्ण झाली आहेत. या नात्यानंतर दोघांनीही आता वेगळे होण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे यामागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (83 year old women married 37 year old husband now share shocking update)

हे वाचलं का?

आयरिस जोन्स 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात मिस्त्र शहरात आली होती. येथे काहिरा या परीसरात आयरिस जोन्सची मोहम्मद इब्राहिम सोबत भेट झाली होती. या भेटीनंतर दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. यानंतर साधारण वर्षभऱानंतर दोघांनीही लग्न (marriage) केले होते. मिस्त्र शहरातील शर्म अल शेख परिसरात दोघांनीही हनीमून केले होते. लग्नानंतर दोन्ही जोडप्याची (married Couple) खूप चर्चा रंगली होती.

हे ही वाचा : Viral Video: ‘पाव किलोचा सचिन, 5 किलोची सीमा.. त्याच्यावर बसली तर’, ही महिला असं का..

दरम्यान लग्नाच्या सुरुवातीचा काळ खूपच आनंदात गेला होता. आता मात्र लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, आयरिसने याबाबतची माहिती दिली आहे. मला मोहम्मदच्या सर्वच गोष्टी आवडायच्या. पण आता खूप अवघड झाले होते. कारण आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असलो तरी आमच्यात खूप भांडणे व्हायची. प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायचो. पण आता सहन होत नाही आहे. मी एक तरूणी नाही, तर मी 83 वर्षाची महिला असल्याचे आयरीस सांगत आहे.

ब्रेकअपच दु:ख कमी करण्यासाठी आता मी मांजर ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. मोहम्मद सोडून गेल्याच्या काही दिवसानंतरच ती मला सापडली आहे. ती माझ्याकडे कोणतीच तक्रार करत नाही, खूप शांत असते आणि सुंदर आहे. मला ती खूप आवडते, असे आयरिस म्हणाली आहे. मला आता मोहम्मदची आठवणही येत नाही, असे आयरिसने सांगितले आहे.

दरम्यान आयरिसचा तिच्या पहिल्या पतीशी 1993 साली तलाक झाला होता. या लग्नापासून तिला 55 वर्षाचा मुलगा आहे. तसचे ती 26 वर्षापासून तिच्या पहिल्या पतीच्या संपर्कात नाही आहे. आता दुसऱ्यांदा तिचे लग्न तुटले आहे. आता चे पुन्हा एकत्र येतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp