Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील 3-4 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबत महाराष्ट्रात नेमकं हवामान कसं असेल याची नेमकी माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. जाणून घ्या त्याविषयी. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 13th july 2024 heavy rain likely in mumbai and suburbs in next 3 4 hours how will rain be in maharashtra)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert)
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज आणि मुंबईतील पावसाचा नेमका अंदाज
मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील 3-4 तासांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Raigad Fort: शिवभक्तांसाठी बॅड न्यूज... रायगड आजपासून पर्यटकांसाठी बंद!
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असा की, शहर आणि उपनगरात मध्यम ते मसुळधार पाऊस होईल. काही ठिकाणी अति मसुळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29°C आणि 24°C च्या आसपास असेल.
कोकणात पावसाचा अंदाज काय?
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Lonavala Bhushi Dam : पिकनिक बेतली जीवावर, कुटुंबच गेले वाहून; व्हिडीओची संपूर्ण स्टोरी
विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT