Rajasthan Crime News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना घडलीय. पतीने पत्नीच्या प्रियकरावर गोळीबार करून त्याचे दोन्ही कान कापले. ही धक्कादायक घटना बोरानाडा परिसरात असलेल्या एका फॅक्ट्रीच्या बाहेर घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला मुथुरादास माथूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना जोधपूरच्या बोरानाडा परिसरात घडली. रमेश बिश्नोई असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. पेशाने तो ट्रक चालक आहे. रमेशचा काही महिन्यांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या पतीला जेव्हा या अफेरबद्दल समजलं, तेव्हा त्याने रागाच्या भरात प्रियकरावर हल्ला केला.
हे ही वाचा >> Crime : डोक्यात हातोडा घालून पतीने केली इंजीनियर पत्नीची निर्घृण हत्या! धक्कादायक कारण आलं समोर
डीसीपी पश्चिम राजऋषी राज वर्मा यांनी दिलेली माहिती अशी की, पती-पत्नीत जवळपास 5 वर्षांपासून वादविवाद सुरु होते. आरोपी पतीला पत्नीच्या अफेयरबाबत समजल्यानंतर त्याने प्रियकरावर हल्ला करण्याचा प्लॅन रचला. रिपोर्टनुसार, रात्री उशिरा दोन वाजता रमेश बिश्नोई साखर घेऊन एका फॅक्टरीत पोहोचला होता.
याच दरम्यान कारने प्रवास करणारा आरोपी त्याच्या सहकाऱ्यांसोबत तिथे पोहोचला. रागाने फणफणलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकरावर गोळीबार केला. त्यानंतर रमेश जखमी झाला. त्यानंतर त्याने रमेशचे दोन्ही कान कापले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी झालेल्या रमेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा >> 'हा' रिल स्टार आहे तरी कोण? डोंबिवलीच्या सुरेंद्र पाटलाच्या पोलिसांनी नाशिकमधून आवळल्या मुसक्या, नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सुरु केला तपास
बोरानाडा पोलीस अधिकारी शकील अहमद यांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष टीम गठित केल्या आहेत. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी आणि पीडित दोघेही बिलाडा पोलीस स्टेशन क्षेत्रातील जांबा गावचे रहिवासी आहेत. हे प्रकरण प्रेम प्रकरणातून घडलं असल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलंय.
ADVERTISEMENT
