Viral: संध्याकाळ होताच नागीण उगवते सूड! 5 जणांना डसली अन् गावात...

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 01:14 PM)

Poisonous Snake: एक गावातील 5 जणांना विषारी साप डसल्याने आता एकच खळबळ माजली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे.

सूड उगवणारी नागीण

सूड उगवणारी नागीण

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकाच गावातील 5 जणांना सर्पदंश

point

विषारी साप चावल्याने तीन जणांचा मृत्यू, दोघांची प्रकृतीच चिंताजनक

point

दंश करणारा साप नागीण असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं

Poisonous Snake Bite: हापूर (उ. प्रदेश): संध्याकाळ होताच नागीण आपल्या बिळातून बाहेर येते आणि गावकऱ्यांना डसते. या विषारी नागिणीच्या दहशतीमुळे संपूर्ण गावाचीच झोप उडाली आहे. अलीकडेच या नागिणीने गावातील महिला पूनम आणि तिची दोन मुले साक्षी आणि तनिष्क यांना दंश केल्याने तिघांचा मृत्यू झाला. या घटनेतून गाव सावरत नाही तोच दुसऱ्या दिवशी एका तरुण आणि एका महिलेला पुन्हा नागिणीने दंश केला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेची सध्या जोरदार चर्चा ही सर्वत्र सुरू आहे. (as soon as the evening falls, the naagin starts taking revenge it bit 5 people one after the other the whole village is in fear)

हे वाचलं का?

ही भयंकर घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील सदरपूर गावातील असून सध्या गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

हे ही वाचा>> Cyclone Dana : दाना चक्रीवादळ प्रचंड वेगाने धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

संपूर्ण गावात नागिणीची दहशत 

गावात वनविभागाच्या पथकाने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे तीन दिवसांपासून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी प्रसारित होताच वन विभागाला खडबडून जाग आली आणि त्यांनी तज्ज्ञ सर्पमित्रांची मदत घेतली. वनविभागाच्या पथकाने सर्पमित्रांसह गावात पोहोचून सापाचा शोध सुरू केला. टीमचा दावा आहे की, त्यांनी साप पकडला आहे, पण तरीही गावकऱ्यांची भीती कमी झालेली नाही, कारण अलीकडेच आणखी एका महिलेला साप चावला आहे.

साप घेत आहे एका पाठोपाठ एक बळी

मिळालेल्या माहितीनुसार, सदरपूर गावातील पूनम आणि तिची दोन मुले साक्षी आणि तनिष्क हे त्यांच्या घरात झोपलेले असताना अचानक सापाने त्यांना चावा घेतला, त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. तिघांचे अंत्यसंस्कार करून गावकरी नुकतेच परतले होते, तेव्हा रात्रीच बातमी आली की, त्याच गावातील आणखी एका तरुणाला साप चावला आहे आणि तो तरुण बेशुद्ध झाला आहे. यावरून तरुणाला तात्काळ मेरठ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या तरुणाचा जीवन आणि मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सापाला पकडण्यासाठी वनविभागाची पाच पथके गावात पाठविण्यात आली आहेत.

हे ही वाचा>>  Mia Khalifa Karwa Chauth : आरारारा खतरनाक! पॉर्न स्टार मिया खलिफासाठी आजोबांचा करवा चौथ, चक्क...

संपूर्ण गावात भीतीचे वातावरण 

वनविभागाच्या पथकाने गावकऱ्यांना चावलेल्या सापाला पकडल्याचा दावा केला आहे, मात्र बुधवारी गावात आणखी एका महिलेला साप चावल्याची बातमी समोर आल्याने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. महिलेला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाने जो साप पकडला आहे तो नागीण आहे की नाही याला कोणताही दुजोरा दिलेला नाही. पण गावकरी दंश करणारा साप ही नागीण असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अजूनही नागिणीची भीती कायम आहे.

    follow whatsapp