Marathi News in Today: नवी दिल्ली: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 5 जून 2023 रोजी दक्षिणपूर्व अरबी समुद्रात (Arabian Sea) चक्रीवादळ (Cyclone) तयार झाले. त्याच्या प्रभावाखाली पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे. आयएमडीने सांगितले की, ‘चक्रीवादळाचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही.’ खाजगी हवामान अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेटच्या मते, काही मॉडेल्स देशाच्या पश्चिम किनार्यासह उत्तरेकडे त्याची हालचाल दर्शवत आहेत. काही मॉडेल्स सुरुवातीच्या उत्तरेकडील हालचाली दर्शवतात आणि ओमान आणि येमेनच्या दिशेने ईशान्य दिशेने वळत असल्याचे संकेत देत आहेत. (biporjoy arabian sea cyclone name bangladesh mumbai monsoon rain)
ADVERTISEMENT
दरम्यान, या चक्रीवादळाला बांगलादेशने बिपरजॉय (Biporjoy) असे नाव दिले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मते, हवामानाचा अंदाज वर्तविणारे गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला (Tropical Cyclones) एक नाव देतात. सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावे दिली जातात. हिंद महासागर क्षेत्रासाठी, 2004 मध्ये चक्रीवादळांचे नाव देण्याच्या सूत्रावर सहमती झाली. या प्रदेशातील आठ देश – बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड – सर्वांनी नावांचा एक संच नियुक्त केला आहे, जे जेव्हा-जेव्हा चक्रीवादळ विकसित होते तेव्हा-तेव्हा अनुक्रमे ती नावं दिली जातात.
अशा प्रकारे निवडली जातात नावं
नावे लक्षात ठेवण्यास आणि उच्चारण्यास सोपी असावीत अशी नावं निवडली जातात. तसेच ती आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त नसावीत असाही एक दंडक आहे. ते वेगवेगळ्या भाषांमधून देखील निवडले जातात. जेणेकरून वेगवेगळ्या प्रदेशातील लोक ती नावं ओळखू शकतील. नामकरण पद्धती कालांतराने विकसित होत गेली. सुरुवातीच्या काळात, वर्णमालेच्या प्रत्येक अक्षराला नेमून दिलेल्या नावासह, नावे वर्णक्रमानुसार निवडली गेली. तथापि, ही प्रणाली गोंधळात टाकणारी आणि लक्षात ठेवण्यास कठीण असल्याचे आढळले, म्हणून पूर्व-परिभाषित नावांची सध्याची प्रणाली सुरू करण्यात आली.
केरळपासून महाराष्ट्रापर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस
चक्रीवादळाच्या शक्यतेबाबत हवामान खात्याने सांगितले की, ‘पुढील 48 तासांत ते उत्तरेकडे सरकून आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. स्कायमेटने एका निवेदनात म्हटले आहे की, केरळपासून महाराष्ट्रापर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या हालचाली निश्चितपणे तीव्र होतील. या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह मुंबईत वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे.
8 ते 10 जून दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्राची स्थिती खराब राहील आणि 9 ते 12 जून दरम्यान गुजरात किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर नेमकी स्थिती स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT