Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo

मिथिलेश गुप्ता

04 Feb 2024 (अपडेटेड: 06 Feb 2024, 10:05 PM)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना गोळ्या कुठे कुठे लागल्या… पहा फोटो…

BJP MLA ganpat gaikwad has been arrested for shooting and injuring mahesh gaikwad, a leader of Chief Minister Eknath Shinde-led Shiv Sena over a land dispute in Thane district of Maharashtra.

BJP MLA ganpat gaikwad has been arrested for shooting and injuring mahesh gaikwad, a leader of Chief Minister Eknath Shinde-led Shiv Sena over a land dispute in Thane district of Maharashtra.

follow google news

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यात आणि चक्क पोलीस ठाण्यातच ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला. यात महेश गायकवाड गंभीर जखमी असून, त्यांना कुठे कुठे गोळ्या लागल्या आहेत. याचा एक्सरे समोर आला आहे. (Where did MLA Ganpat Gaikwad shot at Mahesh Gaikwad)

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार जमिनीचा वादातून ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी महेश गायकवाड जखमी झाले.

कुठे घडली घटना?

उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाल्या.

हेही वाचा >> BJP आमदाराचा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, ‘तो’ वाद काय? Inside Story

जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सहा गोळ्या लागल्या असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलेले असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखाली उपचार सुरू आहेत.

महेश गायकवाडांना कुठे कुठे लागल्या गोळ्या?

दरम्यान, महेश गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासण्या केल्या. त्यांचा एक्सरे काढण्यात आला होता. तो आता समोर आला असून, महेश गायकवाड यांना कुठे कुठे गोळ्या लागलेल्या आहेत, हे त्यात स्पष्ट दिसत आहे. महेश गायकवाड यांना सहा ठिकाणी गोळ्या लागलेल्या आहेत.

हेही वाचा >> ‘मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला’, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

पहा एक्सरे

महेश गायकवाड यांच्या शरीरात गेलेल्या सहा गोळ्या.

 

हिललाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील द्वारली गावात एक जमीन आहे. या 50 गुंठे जमिनीचे मालक एकनाथ जाधव आणि कुटुंबीय आहेत. एकनाथ जाधव आणि कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. त्यांच्यात बोलणीही सुरू होती. याचदरम्यान कंपाऊंड टाकण्यावरुन वाद झाला.

    follow whatsapp