"अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. सॅलरीसोल्जर...." असं ट्विट करत मिटकरींनी नरेश अरोरा यांच्यावर निशाणा साधत पक्षालाही घरचा आहेर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलंच यश मिळालं. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश लोकसभेच्या तुलनेत सर्वात मोठं यश म्हणून पाहिलं जातंय. कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना चार जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी त्यांना फक्त एक जागा जिंकता आली होती. मात्र आता अजित पवार यांनी तब्बल 41 जागा जिंकता आल्या आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत त्यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे. याच यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न नरेश अरोरा करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Eknath Shinde : "माझ्या समर्थनार्थ कुणीही...", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या पक्षाचा प्रचार गुलाबी करण्यात महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या पक्षासाठी प्रचाराची रणनीती आखण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यामुळेच विधानसभेतील यशानंतर नरेश अरोरा यांनी गुलाबी फुलं असलेला बुके देत अजित पवार यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी संतापले. त्यांनी थेट ट्विट करत या गोष्टीचा विरोध केला होता. त्यावरुन आता पक्षाने अमोल मिटकरी यांच्या या प्रकरणातून हात काढून घेतले आहेत. ही भूमिका अमोल मिटकरींचं वैयक्तिक असल्याचं पक्षाने अधिकृत ट्विटरवरुन सांगितलं
अमोल मिटकरींनी काय म्हटलं होतं?
"हे सगळं खोटं आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचं श्रेय आपल्याकडे घेतलं."
राष्ट्रवादीने काय स्पष्टीकरण दिलं?
हे ही वाचा >> Rashmi Shukla : त्या पुन्हा आल्या... रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारणार
"श्री @AmolMitkari22 यांचं ‘डिझाईनबॉक्स्ड’ संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही. @DesignBoxed टीमने विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि पुढेही बजावत राहील यात शंका नाही." असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अधिकृत ट्विट केलं आहे.
मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर
राष्ट्रवादी पक्षाने ट्विट करत अमोल मिटकरींची भूमिका वैयक्तिक असल्याचं म्हटल्यानंतर मिटकरींनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. "हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर" असं खोचक उत्तर मिटकरींनी दिलं आहे.
एकूणच राष्ट्रवादीमध्ये या प्रकरणारवरून अंतर्गत मतभेद आहेत का? असा सवाल आता यावरुन निर्माण होतो आहे.
ADVERTISEMENT