CM Eknath Shinde Resigns : एकनाथ शिंदेंचा राजीनामा, शर्यतीतून बाहेर? काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून...

सुधीर काकडे

26 Nov 2024 (अपडेटेड: 26 Nov 2024, 11:46 AM)

शिंदे, फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले असून, शिंदेंनी राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

point

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंकडेच जबाबदारी

राज्यात 2019 ला स्थापन झालेल्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अजून कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर पुढचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अवघ्या काही तासांमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

राज्यात सध्या विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. तर सध्याच्या सरकारच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर म्हणजेच आज संपणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता सकाळपासून वर्तवली जात होती. त्यानंतर आता तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले असून, शिंदेंनी राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, अद्यापदी शपथविधी का झाला नाही? शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत का? असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. 

मुख्यमंत्री शिंदेच व्हावेत, शिवसैनिकांचा आग्रह

हे ही वाचा >>Amol Mitkari Vs Naresh Arora : अजितदादांच्या खांद्यावर 'नरेश अरोरांचा' हात, मिटकरींचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, काय आहे वाद?

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रह आहे. यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या भेटीसाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर, ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी येताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना न जमण्याचं आवाहन केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा >>Rashmi Shukla : त्या पुन्हा आल्या... रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारणार

फडणवीसांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ?

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना, नेत्यांना बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मागच्या काही दिवसांमध्ये भाजपने मोठी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या यशाचं श्रेय भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. तसंच भाजपने मिळालेल्या आमदारांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे भाजपचाही फडणवीसांना मुख्यमंत्री करावं असा आग्रह असणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे अखेर काय निर्णय होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 
 

    follow whatsapp