Kurla Best Bus Accident : भरधाव BEST बस मार्केटमध्ये घुसली, लोकांना चिरडलं, पाच जणांचा मृत्यू, 30 जखमी

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 10 Dec 2024, 01:32 PM)

Kurla Best Bus Accident Updates: कुर्ला परिसरात घडलेल्या या घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलेला थरार काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या घटनेत लहान मुलं, महिला,  हातगाडी, रिक्षा आणि एका पोलिसांच्या चारचाकी वाहनाला चिरडलं. कुणाच्या डोक्यावरुन, कुणाच्या छातीवरुन तर कुणाच्या पायावरुन बसची चाकं गेल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

कुर्ल्यामध्ये मृत्यू तांडव...

point

BEST बस चालकाने 30 जणांना चिरडलं

point

घटनेत जणांचा जागेवर मृत्यू

Kurla Best Bus Accident News Today : मुंबईतील कुर्ला परिसरात काल रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातानं मुंबई अक्षरश: हादरली आहे. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील मार्केटमध्ये नेहमीसारखी वर्दळ होती. कुणी कामावरुन घरी निघालं होतं, कुणी कुटुंबासोबत खरेदीसाठी आलं होतं, तर कुणी मुलांसाठी खाऊ तर कुणी भाजी विकत घेऊन जात होतं. अशातच बेस्टची एक बस भरधाव वेगात आली, मार्केटमध्ये घुसली आणि 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलं. या घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली असून, स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Inside Story: खळबळजनक! भाजप आमदाराच्या मामाचा मृतदेहच सापडला, कोणी केली हत्या?

कुर्ला परिसरात घडलेल्या या घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलेला थरार काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या घटनेत लहान मुलं, महिला,  हातगाडी, रिक्षा आणि एका पोलिसांच्या चारचाकी वाहनाला चिरडलं. कुणाच्या डोक्यावरुन, कुणाच्या छातीवरुन तर कुणाच्या पायावरुन बसची चाकं गेली आणि अवघ्या काही क्षणात कित्येक कुटुंब उध्वस्त झाली. 

हे ही वाचा >>Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी, 'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बसचालक या घटनेदरम्यान हसत होता, ब्रेक फेल होतो तेव्हा चालक हसत नाही असं म्हणत प्रत्यक्षदर्शी संताप व्यक्त करत होते.लोकांना चिरडत, चिरडत ही बस पुढे गेली आणि काही क्षणात कित्येक कुटुंब उध्वस्त झाले. जवळपास 500 मिटर ही बस भरधाव वेगात गेल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून,

पोलिसांनी याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर आज प्रशासनाकडून बेस्ट बस सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तसंच धक्कादायक म्हणजे बसमध्ये कोणताही बिघाड नसून, चालकानं मद्यपानही केलं नव्हतं असं पोलिस तपासात समोर आलं आहे. 

    follow whatsapp