महाप्रसादातून 500 जणांना विषबाधा, दोरीच्या साहाय्याने लावल्या सलाइन

मुंबई तक

21 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 08:50 AM)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील एका धार्मिक कार्यक्रमामध्ये महाप्रसाद घेतलेल्या 500 लोकांना विषबाधा झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य केंद्रात जिथं जागा मिळेल तिथं रुग्णांना सलाइन लावण्यात आली. तर स्टँड उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांनी दोरीच्या साहाय्याने सलाइन लावून रुग्णांवर उपचार सुरु केले.

Buldhana food poisonings

Buldhana food poisonings

follow google news

बातम्या हायलाइट

point

बुलढाण्यात 500 जणांना विषबाधा

point

महाप्रसादातून 500 जणांना झाली विषबाधा

Buldhana Food Poisoning : जका खान, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात (Lonar) एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणारमधील एका धार्मिक कार्यक्रम सुरु असताना महाप्रसाद झाल्यानंतर 300 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांसह पुरुषांनाही विषबाधा झाली आहे. तर बीबी गावातील (Bibi) प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितले की, हा आकडा 400 ते 500 च्या आसपास असून परिसरातील अनेक शासकीय रुग्णालयामध्ये (Government hospitals) नागरिकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

धार्मिक कार्यक्रमात गोंधळ

लोणारमधील सोमठाणातील मंदिरात सहा दिवस धार्मिक कार्यक्रम सुरू होते. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने सोमठाणा व लगतच्या खापरखेड गावातील भाविक रात्री 10 वाजता मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी आले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर त्यांना काही वेळानंतर पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होऊ लागला. हा त्रास अनेक लोकांना होऊ लागल्यानंतर मात्र गावामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. 

हे ही वाचा >>Farmers Protest Live : शेतकरी पेटले इरेला! दिल्ली मोठा संघर्ष

बेडही पडले कमी

लोणारमधील या घटनेची माहती पोलीस आणि महसूल विभागाला समजताच  विषबाधा झालेल्या रुग्णांना बीबी नावाच्या गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढल्याने बेडही कमी पडू लागले. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. 

दोरीच्या साहाय्याने सलाइन

रुग्णसंख्या प्रचंड असल्याने रुग्णालयामध्ये जिथे जागा मिळेल तिथे त्यांच्यावर उपचार केले जाऊ लागले. दोरीच्या साहाय्याने सलाइन लावण्यात येऊ लागल्या.  

रुग्णसंख्या 500 च्यावर

बीबी गावातील नागरिकांनी सांगितले की, 'महाप्रसादातून 400 ते 500 लोकांना विषबाधा झाली आहे. रुग्णसंख्या मोठी असल्याने काही रुग्णांना मेहकर आणि लोणारमधली सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले' असंही स्थानीक नागरिकांनी सांगितले.

    follow whatsapp