Bus driver heart attack video viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत स्कूल बस (School Bus) चालवताना ड्रायव्हरला हार्ट अॅटक (Heart Attack) आल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर सातवीचा एक विद्यार्थी प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरसह 66 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवतो.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायर होत आहे. (bus driver heart attack while drving student stop school bus video viral)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक स्कूल बस (School Bus) रस्त्यावर धावताना दिसत आहे. हा ड्रायव्हर बस चालवत असताना अचानक त्याला हार्ट अटॅक (Heart Attack) येतो, यामुळे बसचे नियंत्रण बिघडते आणि अपघात होण्याची शक्यता असते. या दरम्यान मागे बसलेला एक 7 वीचा विद्यार्थी ही संपूर्ण घटना पाहतो आणि मदतीसाठी धावतो.
हे ही वाचा : मुंबई हादरली! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून महिलेची हत्या
सातवीचा विद्यार्थी ड्रायव्हरच्या (School Driver)स्टेअरींगवर जाऊन स्टेअरींग संभाळत ब्रेक दाबून गाडी थांबवतो. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनाने ड्रायव्हरसह 66 विद्यार्थ्यांचे प्राण वाचतात.तसेच मोठा अपघात देखील टळतो. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दरम्यान आता विद्यार्थ्यांने दाखवलेल्या प्रसंगावधनाचे सर्व स्तरावर कौतूक होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ही घटना पाहून त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी विद्यार्थ्यांच्या साहसाचे कौतूक केले आहे. तसेच अनेकांनी विद्यार्थ्यांच्या साहसाला सलाम केला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
हे ही वाचा : रुमवर भेटायला बोलावलं,अन् शिक्षक झाला हनीट्रॅपचा शिकार
हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओस शेअर करण्यात येत आहे. दरम्यान याआधी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT