सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रशांत गोमाणे

19 Aug 2023 (अपडेटेड: 19 Aug 2023, 02:47 PM)

टोमॅटो नंतर कांद्याचे भाव देखील वाढणार आहे. केंद्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिली आहे.

central government imposed 40 percent duty on export of opinion til december

central government imposed 40 percent duty on export of opinion til december

follow google news

सर्वसामान्य नागरीकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता टोमॅटो नंतर कांद्याचे भाव देखील वाढणार आहे. केंद्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. (central government imposed 40 percent duty on export of opinion til december)

हे वाचलं का?

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत सरकारने म्हटले आहे की, सरकार 31 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावणार आहे. म्हणजेच आता परदेशात कांदा विकल्यास विक्रेत्याला 40 टक्के शुल्क सरकारला भरावे लागणार आहे. त्य़ामुळे कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :Sanjay Raut:फोटोला चिखल फासला, ‘सामना’ची होळी! CM शिंदेंच्या ठाण्यात काय घडलं?

गेल्या आठवड्यात, ऑक्टोबरमध्ये नवीन पीक येईपर्यंत किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने विशिष्ट प्रदेशांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून कांदे त्वरित सोडण्याची घोषणा केली.तसेच सरकार कांद्याच्या वितरणासाठी ई-लिलाव, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि राज्य प्राधिकरणांसोबतच्या भागीदारीसह ग्राहक सहकारी संस्था आणि कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांद्वारे सवलत देण्यासाठी विविध माध्यमांचा शोध घेत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार कांद्याच्या दरात थोडीशी वाढ दिसू लागली आहे. 10 ऑगस्टपर्यंत, कांद्याची किरकोळ किंमत 27.90 रुपये प्रति किलो होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2 रुपये प्रति किलोने वाढ दर्शवते.

दरम्यान आता टोमॅटोनंतर आता कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.तसेच गृहिणींचे बजेट देखील कोलमडणार आहे.

हे ही वाचा :Crime: बंदुकीचा धाक दाखवून वहिनीवर बलात्कार, नंतर अश्लील व्हिडिओ बनवून…, धक्कादायक घटना

 

    follow whatsapp