गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 156 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून या ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे भाविकांना या ट्रेनची तिकीटे बुक करता येणार आहे. दरम्यान कोणत्या दिवशी कोणत्या गाड्या धावणार आहेत, याचे वेळापत्रक जाणून घेऊय़ात. (central railway run 156 ganpati utsav special train maharashtra)
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड
गाडी क्रमांक 01171 मुंबई – सावंतवाडी रोड डेली स्पेशल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दररोज रात्री 12.20 वाजता सुटणार आहे.गाडी क्रमांक 01172 सावंतवाडी रोडवरून13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सावंतवाडी रोडवरून दररोज दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता पोहोचेल.
मुंबई-मडगाव
गाडी क्रमांक 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ऱात्री 2.10 वाजता मडगावला पोहोचेल. तर गाडी क्र. 01152 मडगावहून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दररोज पहाटे 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
दिवा-रत्नागिरी मेमू
गाडी क्रमांक 01153 स्पेशल ट्रेन दिवा येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 7.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01154 रत्नागिरीहून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दुपारी 3.40 वाजता सुटुन त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.
करमाळी-पनवेल-कुडाळ
गाडी क्रमांक 01187 ही ट्रेन 16,23 आणि 30 सप्टेंबर रोदी करमाळी येथून दुपारी 2.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 2.45 वाजता पनवेलला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01188 ही ट्रेन पनवेलहून 17, 24 सप्टेंबर रोजी आणि 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कुडाळला पोहोचेल.
पुणे-करमाळी/ कुडाळ
गाडी क्रमांक 01169 ही विशेष गाडी 15,22 आणि 29 सप्टेंबर रोजी पुण्याहून सायंकाळी 6.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजचा कुडाळला पोहोचेल तर गाडी क्र. 01170 कुडाळहून 17,24 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 16.05 वाजता कुडाळहन पु्ण्यासाठी सुटणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ
गाडी क्रमांक 01167 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून13,14,19,20,21,24,25,26,27,28 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1 आणि 2 तारखेला चालवण्यात येणार आहे. ही गाडी रात्री 10.15 वाजता लोकमान्य टिळत टर्मिनसहून सुटून कुडाळला दुसऱ्या दिवसी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01168 कुडाळ येथून 14,15,20,21,22,25,26,27,28,29 आणि ऑक्टोबरमध्ये 2 आणि 3 तारखेला चालवण्यात येणार आहे. ही गाडी सकाळी 10.30 वाजता कुडाळहून सुटणार असून त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.
ADVERTISEMENT