Chandrayaan-3: भारताचा ‘चंद्रविजय’… जे अमेरिका-चीनलाही जमलं नाही ते ISRO ने करून दाखवलं!

रोहित गोळे

• 02:08 PM • 23 Aug 2023

Chandrayaan-3: भारताची चांद्रयान-3 ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून आजवर अमेरिका, चीन यासारख्या देशांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कधीही लँडिंग जमलं नव्हंत. मात्र, भारताने या भागात आपलं यान उतरवून मोठा इतिहास रचला आहे.

chandrayaan 3 landing successful vikram lander isro did what even america and china could not do

chandrayaan 3 landing successful vikram lander isro did what even america and china could not do

follow google news

Chandrayaan 3 Landing: बंगळुरू: Chandrayaan-3 ने चंद्राच्या (Moon) पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग (Landing) केले आहे. हे यश मिळवणारा भारत (India) हा जगातील चौथा देश ठरला आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन हेच चंद्रावर यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग करू शकले होते. आता या यादीत भारताने देखील स्थान मिळवलं आहे. पण या तीनही देशांना आजवर जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आहे. ते म्हणजे चंद्राच्या अत्यंत अवघड अशा दक्षिण ध्रुवावर भारताने आपले यान उतरवलं आहे. भारताच्या 140 कोटी लोकांच्या प्रार्थना आणि इस्रोच्या 16,500 शास्त्रज्ञांच्या चार वर्षांच्या मेहनतीचे फळ अखेर मिळाले आहे. (chandrayaan 3 landing successful vikram lander isro did what even america and china could not do)

हे वाचलं का?

इस्रोचे 16,500 शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत पूर्ण झाली आहे. सॉफ्ट लँडिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या जगातील चार देशांमध्ये भारताचे नाव आता सामील झाले आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमागे शास्त्रज्ञांच्या मेहनतीसोबतच सुमारे 140 कोटी लोकांच्या प्रार्थनाही होत्या.

असं झालं विक्रमचं लँडिंग:

  • विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 11.5 मिनिटे लागली.
  • 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढील प्रवास 6.8 किलोमीटरचा होता.
  • 6.8 किमी उंचीवर, वेग 336 मीटर प्रति सेकंद कमी झाला होता. पुढील स्तर 800 मीटर होता.
  • 800 मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधली.
  • 150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान होतं.
  • 60 मीटर उंचीवर लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान होता.
  • 10 मीटर उंचीवर लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद होता.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
  • ISRO च्या शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने हे मिशन आखलं होतं त्यानुसार विक्रम लँडरचं लँडिंग झालं.
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
  • आतापर्यंत फक्त चार वेळा चंद्रावर यान उतरविण्यात आलं आहे. ज्यामध्ये आता भारताचाही नंबर लागला आहे.

विक्रम लँडरवरील चार पेलोड काय काम करतील?

1. रंभा (RAMBHA): हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.

2. चास्टे (ChaSTE): हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.

3. इल्सा (ILSA): हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय हालचालींबाबत तपासणी करेल.

4. लेझर रेट्रोरिफ्लेक्टर एरे (Laser Retroreflector Array (LRA): तो चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत, ते काय करणार?

1. लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS): हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. तसेच खनिजांचाही शोध घेईल.

हे ही वाचा >> Chandrayaan-3 Landing VIDEO: भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल, पुन्हा-पुन्हा पाहावा असा ऐतिहासिक क्षण!

2. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS): ते घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह. ते लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जातील.

शास्त्रज्ञांसाठी काय फायदा?

एकूणच, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर एकत्रितपणे चंद्राचे वातावरण, पृष्ठभाग, रसायने, भूकंप, खनिजे इत्यादींचा अभ्यास करतील. यामुळे इस्रोसह जगभरातील शास्त्रज्ञांना भविष्यातील अभ्यासासाठी माहिती मिळणार आहे. संशोधन करणे सोपे जाईल. ही बाब शास्त्रज्ञांसाठी फायद्याची ठरली आहे.

देशाचा काय फायदा होईल?

जगात आतापर्यंत केवळ तीनच देश चंद्रावर यशस्वीरित्या उतरले होते. अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत युनियन) आणि चीन. आता भारताचे चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंगमध्ये यशस्वी झाले आहे. त्यामुळे सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. तर दक्षिण ध्रुवाच्या क्षेत्रात उतरणारा हा जगातील पहिला देश बनला आहे. त्यामुळे या भागातील महत्त्वाची माहिती ही फक्त भारताला मिळणार आहे.

हे ही वाचा >> Chandrayaan-3 Moon Landing Live Update: भारताने इतिहास रचला, INDIA चंद्रावर पोहचलं… विक्रमचं यशस्वी लँडिंग

इस्रोचा काय फायदा होईल

ISRO हे जगभरात आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक प्रक्षेपणासाठी ओळखले जाते. आतापर्यंत 34 देशांचे 424 परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. सोबत 104 उपग्रह सोडले आहेत. तेही त्याच रॉकेटमधून. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. तर चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. त्यामुळेच चांद्रयान-3 साठी लँडिंग साईट सापडली. मंगळयानाचा महिमा संपूर्ण जगाने पाहिला आहे. चांद्रयान-3 च्या यशामुळे जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांमध्ये इस्रोचे नाव समाविष्ट झालं आहे.

सर्वसामान्यांना होणार मोठा फायदा

पेलोड्स म्हणजेच चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या अंतराळ यानांमध्ये बसवलेली उपकरणे नंतर हवामान आणि दळणवळण उपग्रहांमध्ये वापरली जातात. संरक्षण संबंधित उपग्रहांमध्ये घडते. नकाशा बनवणाऱ्या उपग्रहांमध्ये आढळते. ही उपकरणे देशातील लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्यामुळे संपर्क यंत्रणा विकसित होण्यास मदत होते. देखरेख करणे सोपे होते.

    follow whatsapp