डॉक्टर दाम्पत्यात पेटलेल्या वादाच्या ठिणगीने घेतलं भयानक वळण; संसाराची झाली राखरांगोळी!

रोहिणी ठोंबरे

• 11:18 AM • 29 Jan 2024

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत घरगुती वादानंतर महिलेने रागाच्या भरात स्वत:च्याच घराला आग लावून ते पूर्णपणे जाळून टाकले.

Chhatrapati Sambhajinagar news In a fight of doctor couple angery woman set fire to her own house and burnt it completely

Chhatrapati Sambhajinagar news In a fight of doctor couple angery woman set fire to her own house and burnt it completely

follow google news

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत घरगुती वादानंतर महिलेने रागाच्या भरात स्वत:च्याच घराला आग लावून ते पूर्णपणे जाळून टाकले. डॉक्टर दाम्पत्यामधील भांडणाने शेवटचं टोक गाठल्यानंतर संतापलेल्या पत्नी घराला आग लावून तिथून निघून गेली. (Chhatrapati Sambhajinagar news In a fight of doctor couple angery woman set fire to her own house and burnt it completely)

हे वाचलं का?

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ठाकरे नगरमधील एका घरातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते, त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

वाचा : Sanjay Raut : …तेव्हा ईडीची शाई संपते का? राऊतांचा सरकारवर घणाघात

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली आणि तपासादरम्यान त्या घरात राहणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीमध्ये रविवारी रात्री भांडण झाल्याची माहिती समोर आली.

यानंतर पत्नीने स्वतः घराला आग लावली आणि तेथून निघून गेली. ही आग रात्रभर पसरली आणि सकाळपर्यंत सर्व काही जळून खाक झाले. या घटनेचा तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.

वाचा : NCP Mla Disqualification : नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात धाव! निकाल लांबणार?

मुंबईत पती-पत्नीतील वादाचं हत्याकांडात रूपांतर…

मुंबईत दारूच्या नशेत पत्नीची हत्या झाल्याची नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोरेगाव (पूर्व) येथे एका व्यक्तीने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या केली.’

वाचा : भुजबळांच्या विरोधावर जरांगे भडकले, मराठा अभ्यासक, वकिलांना काय म्हणाले?

अधिकाऱ्याने सांगितले की, ’42 वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालाड भागातील मालवणी येथून अटक केली. यावेळी तो आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. आरोपीची पत्नी परवीन अन्सारी (26) ही घरात गंभीर जखमी अवस्थेत आढळली आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.’

    follow whatsapp