बुटामध्ये होता अतिविषारी कोब्रा, लहान मुलाबाबत नेमकं काय घडलं

मुंबई तक

• 04:56 AM • 18 Sep 2023

तमिळनाडूमधील एका शाळकरी मुलाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. बाहेर जाण्यासाठी निघाला असताना बूट घालताना त्यातून अचानक कोब्रा बाहेर आल्याने त्याचा थोडक्यात जीव वाचला आहे. त्यानंतर सर्पमित्राला बोलवण्यात आले होते.

Tamilnadu snake rescue tamilnadu cuddalore

Tamilnadu snake rescue tamilnadu cuddalore

follow google news

Cobra Rescues : तामिळनाडूतील कुड्डालोरमधील एका शाळकरी मुलाचा जीव धोक्यात येत असतानाच त्याला जीवदान मिळाले आहे. बाहेर जाण्यासाठी लहान मुलगा आपले बूट (Shoes) घालण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याला बुटातून कसला तरी आवाज ऐकू आला आणि तो थोडा वेळ थांबलाही. त्यानंतर ज्यावेळी त्याने लक्ष देऊन बघितले तेव्हा त्याच्या बुटातून लहान कोब्रा (Cobra) बाहेर येताना दिसला. बुटातून साप बाहेर येताच त्याने फुत्कार सोडला होता. त्यावेळी त्या मुलाने घाबरून कुटुंबीयातील आपल्या लोकांना बोलवले. त्यानंतर घरच्यांनी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या एका सर्पमित्राला तात्काळ पाचारण केले. त्यानंतर त्या सर्पमित्राने सापाला पकडून त्याने जंगलात सोडून दिले. सापाला घरातून बाहेर काढल्यानंतर मात्र घरच्यांनी सुटेकच निश्वास सोडला. (cobra in shoe man rescues young hidden in kids tamilnadu cuddalore)

हे वाचलं का?

बुटामध्ये बसला कोब्रा

मंजाकुप्पममध्ये राहणाऱ्या सर्पमित्र चेला यांनी सांगितले की, रविचंद्रन यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, मुलाच्या बुटामध्ये छोटा कोब्रा असून त्याला बाहेर काढायचे आहे. त्यानंतर सर्पमित्र चेला यांनी तात्काळ त्यांचे घर गाठले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना बुटामध्ये असलेला कोब्रा दिसून आला. कोब्रा लहान असल्यामुळे त्याची काळजी घेऊनच त्याला पकडण्यात आले, आणि त्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आला.

हे ही वाचा >> संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन, मोदी सरकारच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

गावामध्ये राहणाऱ्यांनी काळजी घ्या

गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेऊन राहिले पाहिजे. तसेच बुट वगैरे वापरताना लक्षपूर्वक त्याच्या आतामध्ये कोणताही जीव जंतू तर बसला नाही ना हे आधी बघितले पाहिजे. कारण काही वेळा साप आणि इतर प्राणीही बुटामध्ये जाऊन बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजीपूर्वक राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : आमरण उपोषणाला बसलेल्या तरुणाने घेतला गळफास! नांदेड जिल्हा हादरला

दंश झाला तर…

सर्पमित्र चेला यांनी सांगितले की, 50 हजारपेक्षा जास्त सापांचे रेस्क्यू करुन त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे. चेला यांनी कोब्रा सापाविषयी सांगताना म्हटले की, बेबी कोब्रा हा अतिविषारी असतो. बेबी कोब्राने जर दंश केला तर त्यामध्ये मृत्यूही होऊ शकतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. चेला यांनी सांगितले की, मी रोज दहा ते पंधरा सापांना पकडतो आणि वेपूरच्या जंगलात सुरक्षितपणे सोडून देतो.

    follow whatsapp