धक्कादायक.. Family Man 3 च्या अभिनेत्यासोबत काय झालं? संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांकडून हत्येचा आरोप!

Family Man 3 actor death: सध्या चर्चेत असलेल्या 'फॅमिली मॅन 3' या वेब सीरीजच्या सीझन 3 मधील अभिनेता रोहित बसफोर याचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे.

Family Man 3 च्या अभिनेत्यासोबत काय झालं? संशयास्पद मृत्यू,

Family Man 3 च्या अभिनेत्यासोबत काय झालं? संशयास्पद मृत्यू,

मुंबई तक

29 Apr 2025 (अपडेटेड: 29 Apr 2025, 02:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Family Man 3 च्या अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

point

कसा झाला अभिनेत्याचा मृत्यू?

point

कुटुंबीयांना मात्र हत्येचा संशय

Actor Rohit Basfor Died: मनोरंजन विश्वातील एक मोठी आणि दु:खद बातमी समोर आली आहे. सध्या चर्चेत असलेल्या 'फॅमिली मॅन 3' या वेब सीरीजच्या सीझन 3 मध्ये अभिनेता रोहित बसफोर याने आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच छाप पाडली. मात्र, याच अभिनेत्याचे निधन झाल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी 27 एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटी मधील गरभंगा धबधब्यात रोहित मृतावस्थेत सापडला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. 

हे वाचलं का?

कधी आणि कसा झाला मृत्यू?

राणी पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना दुपारच्या वेळी 2 वाजताच्या सुमाराम घडली. रोहित आपल्या 9 मित्रांसोबत सहलीला गेला होता आणि त्याच वेळी धबधब्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीसांच्या अधिकृत सूत्रांनुसार, त्यांना सायंकाळी 4 वाजताच्या सुमाराम ही बातमी कळाली आणि ते 4:30 वाजता घटनास्थळी पोहचले. यानंतर, एसडीआरएफच्या टीमने संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास रोहितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

रोहित बसफोर चुकून धबधब्यामध्ये पडला असल्याचे सुरूवातीच्या तपासावरून समोर आले. पोलिसांचे म्हणण्यानुसार, अद्याप कोणताही गैरप्रकार घडला असल्याचा संशय उपस्थित झालेला नाही. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा: पुन्हा एक सासू जावयासोबत पळाली! फोनवर गप्पा अन्... मुलीच्या आईचा जडला जावयावर जीव!

कुटुंबीयांना हत्या केल्याचा संशय

या अभिनेत्याचे असे अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रोहितची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबाने संपूर्ण घटनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. रोहितला जाणूनबुजून धोकादायक ठिकाणी नेण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याचा फोनही बंद होता. कुटुंबीयांच्या मते, रोहितला पोहता येत नव्हते. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता रोहितच्या मृत्यूमागील सत्य तपासानंतरच कळू शकेल.

हे ही वाचा: लेकानं स्वत:ला संपवलं, आईला पाहावलं नाही म्हणून तिनंही विष प्राशन केलं... बीड जिल्हा हळहळला, प्रकरण काय?

रोहितच्या निधनामुळे चाहते दु:खी

रोहित बासफोरने मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्या लोकप्रिय वेब सीरिज 'फॅमिली मॅन ३' मध्ये काम केले आहे. त्याची ही सीरिज नोव्हेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण रिलीज होण्यापूर्वीच या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सर्व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 

    follow whatsapp