Bhavana Gawali : 'अरे केव्हा होईल सॉल्व', शिंदेंच्या खासदाराला शेतकऱ्यांनी घेतलं फैलावर

मुंबई तक

• 05:30 PM • 13 Feb 2024

Farmer Angry on MP Bhavana Gawali Yavatmal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची घटना घडली आहे. भावना गवळी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गावात दाखल झाल्या होत्या. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भावना गवळींवर प्रश्नांची सरबत्ती केली होती.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची घटना घडली आहे.

farmer angry on mp bhavana gawali yavatmal babhulgaon inspect the damage area maharashtra politivs farmer protest

follow google news

बातम्या हायलाइट

point

भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले

point

संतप्त शेतकऱ्यांनी भावना गवळींवर प्रश्नांची सरबत्ती

point

भावना गवळींसमोर शेतकऱ्यांचा सरकारवर संताप

Farmer Angry on MP Bhavana Gawali Yavatmal : भास्कर मेहरे, यवतमाळ :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची घटना घडली आहे. भावना गवळी (Bhavana Gawali) या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गावात दाखल झाल्या होत्या. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भावना गवळींवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. या दरम्यान गवळी यांचे कार्यकर्ते आणि संतापलेल्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना घडली.  (farmer angry on mp bhavana gawali yavatmal babhulgaon inspect the damage area maharashtra politivs farmer protest) 

हे वाचलं का?

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील गारपिटग्रस्त भागाची पाहणी करायला गेल्या होत्या.यावेळी भावना गवळी यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. संतप्त शेतकऱ्यांनी खासदारावर प्रश्नाची चांगलीच सरबत्ती केली. कापूस, सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे, पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही, मागील वर्षातले खरडीचे पैसे, अतिवृष्टीची मदत, शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही तसेच सव्वा लाखात घरकुल कसे बांधायचे? अशा अनेक प्रश्नांचा पाढा शेतकऱ्यांनी भावना गवळींसमोर मांडत सरकारवर संताप व्यक्त केला होता.

हे ही वाचा Ashok Chavan : 'मुंबई काँग्रसचे अध्यक्ष...' चव्हाण बोलून फसले मग फडणवीसांनी सुधारली चूक

एका शेतकऱ्याने यावेळी भावना गवळी यांना कापूस देखील दाखवला होता. यावेळी शेतकरी म्हणाला, साडे चार हजार रूपयाला कापूस बघता, 4 हजार रूपये मजूरी ही मिळत नाही. तुम्ही वर्ध्याचं प्रकरण ऐकलं असेल ना, काडी पेटवावी लागेल, असे थेट शेतकऱ्याने म्हटले आहे. प्रॉब्लेम तर आहे, करू ना सॉल्व....अरे केव्हा होईल सॉल्व मॅडम...कष्टकऱ्यांचा जीव घ्यायला लावलाय, 10 कष्टकरी मेले की सरकारला जाग येते. तो पर्यंत नाही येत, असा संताप देखील एका शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. 

या दरम्यान गवळी यांचे कार्यकर्ते आणि संतापलेल्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना घडली.शेतकरी संकटात असताना तुम्ही कुठे होत्या असा सवाल करीत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली.

हे ही वाचा गौप्यस्फोट! "चव्हाण शिंदेंसोबतच सोडणार होते काँग्रेस"

    follow whatsapp