हमीरपूर: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथे एका पाळीव कुत्रीने 9 पिल्लांना जन्म दिला. ज्यांच्या आनंदात मालकीण बाईने एका पार्टीचं आयोजन केलं. यावेळी कुत्र्यांचा जन्म झाल्यानंतर सहाव्या दिवशी संपूर्ण गावाला अगदी जंगी पार्टी देण्यात आली. त्यांच्या जन्माचा थाटामाट असा होता की, मालकीण बाईने संपूर्ण गावालाच जेवण दिलं. एवढेच नाही तर महिलांनी यावेळी गाण्यांची मैफलही जमवली. ‘चटणी’ असे या कुत्रीचे नाव आहे. (female dog gave birth to 9 puppies in joy lady owner threw a party for 400 people)
ADVERTISEMENT
हे प्रकरण हमीरपूर जिल्ह्यातील मेरापूर भागातील आहे. जिथे एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्रीने एकाच वेळी 9 पिल्लांना जन्म दिला. त्यामुळेच या कुटुंबाने अनोख्या पद्धतीने जल्लोष केला. ज्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या भागातील लोकांनाही खास निमंत्रण दिलं होतं.
मोठ्या थाटामाटात पार्टी
यावेळी पाहुण्यासाठी चक्क पुरी, भाजी, भात आणि मिठाई तयार करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या साथीने महिला गाणी गात होत्या. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना हे दृश्य पाहिल्यावर असंच वाटलं की, या घरात जणू काय लग्नच आहे. पण जेव्हा या पार्टीमागचं नेमकं कारण कळलं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
हे ही वाचा>> फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्… रक्ताच्या थारोळ्यात बाप-लेकीचा मृतदेह, मुलगा फरार
राजकली या महिलेने ‘चटनी’ नावाची कुत्री पाळली आहे. सलग तिसऱ्या वर्षी चटणीने गेल्या आठवड्यात नऊ पिल्लांना एकत्र जन्म दिला. ही सर्व पिल्ले निरोगी आहेत. या आधी जन्मलेली कुत्र्याची पिल्लं मोठी झाल्यावर दुसरीकडे निघून गेली. पण चटणीने राजकलीचे घर सोडले नाही.
शेजाऱ्यांसाठी मेजवानी
राजकलीने सांगितले की, जेव्हापासून तिने ही कुत्री घरात आणली तेव्हापासून तिच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. चटणीने एकाच वेळी नऊ पिल्लांना जन्म देण्याचे हे तिसरे वर्ष आहे. साधारणपणे कुत्री ही चार ते सहा पिल्लांना जन्म देते. पण राजकलीच्या कुत्रीने तब्बल 9 पिल्लांना जन्म दिला. त्यामुळेच अत्यानंद झालेल्या राजकलीने या प्रित्यर्थ कुटुंबासह शेजाऱ्यांना खास मेजवानी दिली.
हे ही वाचा>> पत्नीने पतीला चोपलं, घरात कोंडलं… महिलेने का केला एवढा राडा?
या पार्टीत चारशेहून अधिक लोक सहभागी झाले होते. ज्यांच्या पाहुणचारासाठी पुरी आणि भाजीबरोबरच भात आणि कडी तयार केली होती. बुधवारी सायंकाळपासूनच पाहुण्यांनी राजकलीच्या घरी यायला सुरुवात केलेली. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी ‘चटणी’ला सुंदर सजवण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT