Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाट पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद दुसरा जिल्हा वगळता सर्व ठिकाणी उष्ण व दमट आणि कोरडं हवामानाचं चित्र आहे. या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात 45 अंश सेल्सियस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. काल बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजी नगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आज गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं आहे आजचं हवामान?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक घाट परिसर, सातारा घाट परिसरात कोरडं हवामान असणार आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर!
तसच सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूरमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यामध्ये अति उष्णता असणार आहे. अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया,वाशिम, यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रादेशिक हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही.
तसच काल बुधवारी पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालनामध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता होती.
हे ही वाचा >> पहलगाम दहशतवादी हल्ल्याची 'ही' आहे Inside स्टोरी, तुम्हीही जाल हादरून!
ADVERTISEMENT
