Ganesh chaturthi 2024: फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना?

मुंबई तक

• 06:09 PM • 26 Aug 2024

Ganesh Chaturthi sthapana Muhurat 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी 10 दिवसांचा गणेश उत्सव सुरू होतो. यावेळी गणेश चतुर्थी शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी 10 दिवसांचा गणेश उत्सव सुरू होतो.

point

'या' शुभ मुहूर्तावर होणार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

point

गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे.

Ganesh Chaturthi sthapana Muhurat 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी 10 दिवसांचा गणेश उत्सव सुरू होतो. यावेळी गणेश चतुर्थी शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. घरात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर शुभ मुहूर्तावर आणि योग्य ठिकाणी त्याची मूर्ती स्थापित केली जाते. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जन होईपर्यंत मूर्ती जागेवरून हलवली जात नाही. चला मग जाणून घेऊया यंदा गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. (ganesh chaturhti 2024 ganesh murti sthapana vidhi niyam shubh muhurat)

हे वाचलं का?

7 सप्टेंबर 2024, गणेश प्रतिष्ठापना आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त-

  • गणेश पूजन मुहूर्त- सकाळी 11:03 ते दुपारी 01:34 पर्यंत
  • अभिजीत मुहूर्त- सकाळी 11:54 ते दुपारी 12:44 पर्यंत
  • विजय मुहूर्त- दुपारी 02:24 ते 03:14 पर्यंत
  • सर्वार्थ सिद्धी योग- दुपारी 12:34 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:03 पर्यंत
  • रवि योग- सकाळी 06:02 ते दुपारी 12:34 पर्यंत.

असे मानले जाते की गणपती बाप्पाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेशाची स्थापना आणि पूजेसाठी योग्य मानली जाते. मध्यान्ह हा दुपारच्या समतुल्य मानला जातो. मध्यमना मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधीपूर्वक गणेशाची पूजा करतात ज्याला षोडशोपचार गणपती पूजा म्हणतात.

गणेशमूर्ती स्थापनेचे नियम काय आहेत?

  • मातीच्या मूर्तीची स्थापना करा, ज्याची सोंड उजवीकडे आहे. 

  • मूर्ती फक्त शुभ मुहूर्तावर स्थापित करा, विशेषत: मध्यान्हाच्या वेळी स्थापित करावी.

  • घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यातच गणेश मूर्तीची स्थापना करा. ते स्थान पवित्र असले पाहिजे.
  • गणेशाची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून असावी.
  • लाकडी पाट आणि त्यावर लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर बाप्पाची मूर्ती स्थापित करा.
  • गणेशमूर्तीची एकदा स्थापना केल्यानंतर ती एका जागेवरून हलवू नये. विसर्जनाच्या वेळीच मूर्ती हलवावी.
  • गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करताना मनात वाईट भावना आणू नका किंवा कोणतेही वाईट कृत्य करू नका.
  • गणेश स्थापनेच्या वेळी घरी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न तयार करू नका. सात्विक अन्न खा.
  • जर तुम्ही गणेशाची स्थापना करत असाल तर पूजा आरती करा आणि विसर्जन होईपर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाच्या आवडीचे भोग तयार करा.
  • स्थापनेनंतर विधीप्रमाणे गणपतीची पूजा-आरती करावी व नंतर प्रसाद वाटप करावा.


 

    follow whatsapp